Tuesday, September 22, 2026
Homeगडचिरोली२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी तसेच स्थानिक पातळीवर डिजिटल सेवा सक्षम करण्याच्या दृष्टीने मिनी सेतू केंद्रचालकांची(आपले सरकार सेवा केंद्र)भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.या अनुषंगाने मिनी सेतू केंद्रचालक निवडीकरिता प्राप्त अर्जांची अंतिम पात्र व अपात्र यादी जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिलेल्या माहितीनुसार,इलेक्ट्रॉनिक्स,माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाच्या ९ जुलै २०२६ रोजीच्या शासन शुद्धीपत्रकातील तरतुदींनुसार ही निवड प्रक्रिया राबविली जात आहे.या शुद्धीपत्रकातील मुद्दा क्र.७ (४)अन्वये संबंधित उमेदवारांच्या पोलीस चारित्र्य पडताळणीच्या अटींच्या अधीन राहून ही अंतिम पात्र-अपात्र यादी तयार करण्यात आली आहे.
नागरिकांना थेट गावपातळीवर पारदर्शक व गतिमान डिजिटल सेवांचा लाभ मिळावा,यासाठी ही केंद्रे अधिक सक्षम केली जात आहेत.अर्जदारांना सदर अंतिम पात्र व अपात्र यादी गडचिरोली जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.gadchiroli.gov.in)पाहता येईल,असे प्रशासनामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

आता देसाईगंज तालुक्याच्या ग्रामपंचायतींमध्ये भ्रष्टाचाराचा कळस..!

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-नुकतेच गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यांची आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आलीत. सार्वजनिक निधीचा अपहार करणे आणि शासकीय योजनांमध्ये...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!