Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंजरात्रीचा अंधार अन् अवैध रेती उपस्याची दंडार....- जुनी वडसा,आमगांव वैनगंगा नदी पात्रातून...

रात्रीचा अंधार अन् अवैध रेती उपस्याची दंडार….- जुनी वडसा,आमगांव वैनगंगा नदी पात्रातून अवैध रेतीची तस्करी…- तस्करांनी गावातील नागरिकांची उडवली झोप…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- तालुक्यातील जुनी वडसा,आमगांव वैनगंगा नदी पात्रातून रेती तस्कर रात्रीच्या अंधारचा व शासकीय सुट्ट्यांचा फायदा घेत ढेक-ढेक ट्रॅक्टरचा आवाज करीत सुसाट वेगाने गावातील मुख्य रस्त्यावरील व इतर चोरट्या मार्गाने वाहने पळवित गावातील नागरिकांची झोप उडवीली आहे.अशातच ‘रात्रीचा अंधार अन् अवैध रेती उपस्याची दंडार’ आणखी किती दिवस सुरू राहणार आहे.यांवर आवर घालणार कोण?असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सध्याच्या घडीला सगळीकडेच अवैध रेती उपसा मोठ्या प्रमाणावर केला जातो आहे.शासन स्तरावरून अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर कितीही कठोर पावले उचलली जात असली तरीही रेती चोरटे याला न जुमानता आपलीच मनमानी करून झटपट श्रीमंतीच्या नादात अवैध रेती चोरी करण्याकडे वळलेली दिसून येत आहे.अशातच देसाईगंज तालुक्यातील जुनी वडसा,आमगांव वैनगंगा नदी पात्रातून अवैध रेतीचा उपसा रात्री १२ ते १ वाजे पासून मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.शासकीय कार्यालयांना तीन दिवसांच्या सार्वजनिक सुट्ट्यांचा फायदा रेती चोरटे घेत असल्याचे दिसून येत आहे. सुट्ट्यांमुळे रेती तस्करांना सुगीचे दिवस आले असल्याचे कळते.काही शासकीय कर्मचारी मुख्यालयी वास्तव्यास राहत नसल्याने याचाच फायदा रेती तस्कर घेतांना दिसून येत आहेत.

हल्ली रेतीचा तुटवडा अनेकांना जाणवत असल्याने रेतीचे भाव गगनाला भिडले आहेत.रेती चोरट्यांची यामुळे चांदीच-चांदी पहावयास मिळते आहे.अंतर ठरवून रेतीचे दर ठरविले जात आहेत.एक ब्रास रेतीसाठी ३ हजार ते ५ हजार रुपये सर्वसामान्य नागरिकांना मोजावे लागत आहे.यामुळे रेती तस्करांची चांदी तर सर्वसामान्य नागरिकांची वांदी झाली आहे. शासनाच्या उदासीन धोणामुळे अनेक रेती घाटांची लिलाव प्रक्रिया रखडली गेली आहे.त्यामुळेच अवैध रेती तस्करी फोफावली असल्याचे सगळीकडेच चित्र निर्माण झाले आहे.मात्र यामधे सर्वसामान्य नागरिकांची गळचेपी केली जाते आहे.’रात्रीचा अंधार अन् अवैध रेती उपस्याची दंडार’ कधी बंद होणार व अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर आळा घातला जाणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!