Thursday, September 17, 2026
Homeचंद्रपूरवादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट; वीज कोसळून दोघांचा मृत्यू..

वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट; वीज कोसळून दोघांचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्यात आज,गुरुवार १७ सप्टेंबर रोजी काही भागात अचानकपणे वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावून वीज कोसळण्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल आणि पोंभूर्णा तालुक्यात वीज पडण्याच्या घटना घडल्या आहेत.चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील उसराळा येथे वीज पडून एका गुराख्याचा मृत्यू झाला.दीपक नारायण मडावी वय ३६ वर्षे,रा.उसराळा हे शेळ्या चारण्यासाठी गावालगतच्या परिसरात गेले असता आज दुपारचे दोन वाजताच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह मेघगर्जना आणि पाऊस सुरू असतांनाच अचानकपणे त्यांच्या अंगावर वीज कोसळली.यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.तर पोंभूर्णा तालुक्यातील चेकठाणेवासना येथे केशव डोनु गुडी वय ५५ वर्षे हे पत्नी वैशाली केशव गुडी वय ४५ वर्षे यांच्यासह शेतातील कामे आटोपून घरी परतत होते.दरम्यान,ऋषी आलाम यांच्या शेताजवळ अचानक वीज कोसळली.या दुर्घटनेत केशव गुडी यांचा मृत्यू झाला,तर पत्नी वैशाली ह्या गंभीर जखमी झाल्या. जखमी वैशाली गुडी यांना तातडीने पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक आज,गुरुवार १७ सप्टेंबरला...

शाळांच्या गुणवत्तावाढीला बळ; पवित्र पोर्टलच्या माध्यमातून देसाईगंज नगरपरिषद शाळांना मिळाले सहा नवे शिक्षक.

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-नगरपरिषद देसाईगंज अंतर्गत शाळांमधील शैक्षणिक मनुष्यबळाची कमतरता दूर करण्याच्या दृष्टीने पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे सहा नवनियुक्त शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदरचे नियुक्ती...

धान पिकावर रोगाचा प्रादुर्भाव; आमदार मसरामांकडून कृषी विभागाला तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील विविध भागांत धान पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून प्राप्त होताच तक्रारींची तात्काळ दखल घेत...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पारंपरिक कारागीर व शिल्पकारांचा टूल किट व कर्ज मंजुरी पत्र वाटप सोहळा’ संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढवून जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी प्रत्येक नागरिकाच्या श्रमाला उत्पादकतेची जोड देणे आवश्यक आहे.पारंपरिक कारागीर,शिल्पकार आणि असंघटित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!