- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज पोलिसांनी तालुक्यातील नागरिकांच्या हरविलेल्या तब्बल २५ मोबाईलचा शोध घेऊन आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी मूळ मालकांना परत केले.विशेष म्हणजे,मोबाईलमध्ये नागरिकांची वैयक्तिक माहिती,बँकिंग व्यवहार,कागदपत्रे आणि महत्त्वाचा डेटा साठवलेला असतो.त्यामुळे मोबाईल हरविल्यानंतर नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते.अशावेळी देसाईगंज पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे संबंधित मोबाईल धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
देसाईगंज तालुक्यातील बऱ्याच नागरिकांचे मोबाईल फोन हरवले होते.त्यानुसार,नागरिकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित प्रकरणांची गंभीर दखल घेत तांत्रिक तपासाला सुरुवात केली. सीईआयआर पोर्टलच्या माध्यमातून मोबाईल फोनच्या आयएमईआय क्रमांकांचा मागोवा घेत विविध ठिकाणी त्यांचे लोकेशन शोधण्यात आले.पोलिसांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा,तांत्रिक विश्लेषण आणि सायबर यंत्रणेच्या मदतीने हे मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळविले आहे.मोबाईल शोधून मूळ मालकांना परत देतांना देसाईगंज पोलिसांनी सर्व
आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली व २५ हरविलेले मोबाईल फोन मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले.सदरची कार्यवाही कुरखेडा उपविभागिय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे यांचे मार्गदर्शनाखाली देसाईगंज पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक स्वप्निल इजप्पवार यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष गोडबोले,पोलीस पथक तथा अंमलदार शैलेश तोरपकवार यांनी केली.
- Advertisement -

