Tuesday, August 25, 2026
Homeनागपूरशिवशाही बस शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक..- नागपूर-अमरावती मार्गावरील चित्तथरारक घटना; प्रवाशांचा जीव...

शिवशाही बस शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक..- नागपूर-अमरावती मार्गावरील चित्तथरारक घटना; प्रवाशांचा जीव टांगणीला

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर:- कित्तेक वेळाआगारातून बस निघण्यापूर्वी देखभाल दुरुस्ती कडे महामंडळाचे अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्याने कधी रस्त्यातच बसचे बिघाड होते; तर कधी कोणती अनुचित घटना होणार याचा काही नेम नाही.त्यामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला येऊन खासगी प्रवास सुखकर असल्याची प्रचिती हल्ली दिसून येत आहे.अशातच नागपूर-अमरावती मार्गावर आज ४ एप्रिल ला सकाळी ९ वाजेच्या सुमारास चित्तथरारक घटना घडली असून शिवशाही बसला अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.बस जळून खाक होण्यापूर्वीच प्रसंगावधान साधत बस मधील १६ प्रवाशांनी क्षणाचाही विलंब न लावता खाली उतरल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

नागपूर येथील गणेशपेठ आगारातून सकाळी ९ च्या सुमारास शिवशाही बस नागपुरातून अमरावतीला निघाली होती. शिवशाही बस नागपूर-अमरावती महामार्गावर कोंढाळी नजीकच्या साईबाबा मंदिराजवळ आली असता सदर बसला अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.आग लागताच बसमधील १६ प्रवाशी पटापट खाली उतरू लागले.प्रवाशी खाली उतरताच बसणे रौद्ररूप धारण करून संपूर्ण बस जळून खाक झाली.बसणे पेट घेताच बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर झाल्याने काही काळ मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बीअर बारचा परवाना देण्यासाठी पैश्याची लालच; अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बीअर बारचा परवाना देण्यासाठी आठ लाख रुपयांच्या लाचेच्या रकमेची मागणी करून तब्बल अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी)नागपूर पथकाने...

अचानक समोर आलेल्या कारला दुचाकीची धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शहरात भीषण अपघाताची घटना घडून एका २० वर्षीय दुचाकी चालक तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला; तर सहकारी तरुण गंभीर जखमी झाल्याची...

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!