Monday, October 5, 2026
Homeनागपूरघोरपडींच्या शिकार प्रकरणी चौघांना रंगेहाथ पकडले..

घोरपडींच्या शिकार प्रकरणी चौघांना रंगेहाथ पकडले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-जिल्ह्याच्या पवनी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सावंगी बिटात दोन घोरपडींची शिकार करून त्यांचे मांस कापतांना चौघांना वन विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक करून घटनास्थळावरून दोन घोरपडींचे मांस,दोन सत्तूर,दोन ब्लेड,भिर्रा प्रजातीचा एक लाकडी ओंडका आणि दोन मोबाईल जप्त केले.सदरची कारवाई आज,गुरुवार १३ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास करण्यात आली.प्रकरणी रविंद्र बुध्या मरसकोल्हे वय ४२ वर्षे,प्रशांत विवेक मरसकोल्हे वय २६ वर्षे,सागर शेषराव धुर्वे वय २३ वर्षे व दिनेश जगत आहाके वय १८ वर्षे,सर्व रा.सावंगी,ता.रामटेक,जि.नागपूर असे अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांना रामटेक न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
नागपूर वनविभागांतर्गत पवनी वनपरिक्षेत्रातील सावंगी बीटातील राखीव वन कक्ष क्रमांक-४२३ मध्ये आज गुरुवारच्या सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास वनकर्मचारी नियमित गस्तीवर असतांना वनक्षेत्रात संशयास्पद हालचाली दिसताच धाड टाकून शिकार करणाऱ्या टोळीला घेरून चौघांना ताब्यात घेण्यात आले. तपासात आरोपींनी राखीव वनक्षेत्रात अवैध प्रवेश करून वन्यजीवांची शिकार केल्याचे  निष्पन्न झाल्याने प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.सदरची कारवाई नागपूर वनविभागाच्या उपवनसंरक्षक डॉ.विनीता व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली,सहाय्यक वनसंरक्षक गोविंद लुचे आणि मानद वन्यजीव रक्षक अविनाश लोंढे यांच्या देखरेखीखाली पार पडली.तर कारवाईत पवनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बनसोड,क्षेत्र सहाय्यक वाय.बी.पाटील,बीटरक्षक एम.पी.पंचबुधे,वनरक्षक जी.ओ.राऊत,व्ही.एस.सोडगीर,एस.आर.मरसकोल्हे, इमरत टेकाम,विनोद टेकाम आणि इतर वनकर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

“उमेद मॉल”च्या माध्यमातून महिला उद्योजकांना मिळणार मोठे व्यासपीठ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला स्वयं सहाय्यता समूहांच्या वस्तु व उत्पादन विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी राज्य...

अखेर भाजपचा सस्पेन्स संपला; विधान परिषदेच्या तीन उमेदवारांची घोषणा.. – नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी सुधाकर कोहळे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसने डॉ.अभिजीत वंजारी यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.अश्यातच आता...

हातातोंडाशी आलेले पीक जंगली हत्तींमुळे उद्ध्वस्त; शेतकरी चिंताग्रस्त..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जंगली हत्तींचा कळप ऐन निसाव्यावर आलेल्या धानपिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस करीत असल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत. अश्यातच गेल्या तीन दिवसांपासून जंगली...

भरधाव ट्रेलरची दुचाकीला जोरदार धडक; पती-पत्नी व चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरहून बुटीबोरीकडे दुचाकीने निघालेल्या कुटुंबियांवर काळाने घाला घालून दुचाकीवरील पती, पत्नी व अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्याचा करून अंत झाला.तर त्यांचा ६...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!