Friday, September 25, 2026
Homeनागपूरअन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई; ४६ लाख रुपये किंमतीचा चीज...

अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई; ४६ लाख रुपये किंमतीचा चीज ॲनालॉग व दही नष्ट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-महाराष्ट्रात पनीर सारखे दिसणारे चीज ॲनालॉगचे उत्पादन,साठवणूक,वितरण आणि विक्रीवर प्रतिबंध असतांनाही काही विक्रेते ग्राहकांची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात चीज ॲनालॉगची विक्री करतांना दिसून येतात.अश्यातच या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने(एफडीए) नागपुरात धडक कारवाई करत शहरातील दोन डेअरी आस्थापनांतील चीज ॲनालॉग व दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त करून कारवाईचा बडगा उगारला.यात तब्बल २३ हजार किलोचा जवळपास ४६ लाख रुपये किंमतीचा चीज ॲनालॉग व दही नष्ट करण्यात आला.यात नागपूर शहरातील मे.चंद्रा डेअरी,पिवळी नदी, वांजरा आणि मे.शिवम डेअरी फूड प्रॉडक्ट्स,ईंटा भट्टी चौक येथे ‘एफडीए’च्या पथकाने तपासणी केली.यात ‘चंद्रा डेअरी’ येथे दही,चीज ॲनालॉग आणि स्किम मिल्क पावडरचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले.त्यानंतर ४२ लाख ३० हजार ६९० रुपये किंमतीचा २२ हजार ३५ किलोचा साठा जप्त करण्यात आला. ‘शिवम डेअरी फूड प्रॉडक्ट्स’ येथे उत्पादित चीज ॲनालॉगचा नमुना घेण्यात आल्यानंतर ४ लाख ६२ हजार ८०० रुपयांचा १ हजार ९३० किलोचा साठा जप्त करण्यात आला.राज्यात चीज ॲनालॉगचे उत्पादन, साठवणूक,वितरण आणि विक्रीवर प्रतिबंध घालण्यात आला आहे.त्यानुसार या दोन्ही आस्थापनांमधील दही व चीज ॲनालॉगचा साठा नष्ट करण्यात आला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा फटका..! भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद; ६३ गावांचा तुटला संपर्क..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या विविध भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे.अश्यातच जिल्ह्यातील पर्लकोटा नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली...

जुनी वडसा येथे झुडपी जंगलातील वनपट्ट्यांबाबत सभापती सचिन खरकाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषद हद्दीतील जुनी वडसा येथील झुडपी जंगल परिसरावर वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या आणि शेती कसत असलेल्या नागरिकांना वनजमिनीचे पट्टे मिळवून देण्यासाठी...

शिधापत्रिकाधारकांनी १५ दिवसांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना धान्याचा लाभ नियमितपणे मिळावा आणि शिधापत्रिकेवरील सदस्यांची माहिती अचूक व अद्ययावत राहावी,यासाठी गडचिरोली तालुक्यात ई-केवायसी प्रक्रिया...

“आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही; मला माफ करा” अशी चिठ्ठी लिहून वकिलाने घेतला गळफास.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुण वकिलाने गळफास घेण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली.त्यात "आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही,मला माफ करा.माझ्या बहिणीकडे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!