- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-बारावीत शिक्षण घेणारी विद्यार्थिनी सहा महिन्यांपूर्वी घरी कुणालाही काहीही न सांगता निघून गेल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला.मात्र,मुलीची काहीच माहिती मिळत नसल्याने अखेर पालकांनी नागपूरच्या शांतीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.अश्यातच शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झालेली बारावीची विद्यार्थिनी नागपूर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने शोधून काढली. विशेष म्हणजे,ती बेपत्ता झाल्यापासून चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील २१ वर्षीय प्रज्ज्वल मारोती ठोंबरे या तरुणासोबत राहत होती व मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर दोघांनी विवाह केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
प्रज्ज्वल ठोंबरे हा रोजगारानिमित्त काही काळ नागपुरात वास्तव्यास होता.त्याच काळात दोघांची ओळख झाली आणि नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले.२० जानेवारी २०२६ रोजी बारावीत शिकणारी विद्यार्थिनी कोणालाही न सांगता घरातून निघून गेली.ती रात्रीपर्यंत परत न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला.मुलीचा कुठेही थांगपत्ता लागलेला नसल्याने शांतीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.त्यानुसार,अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला. दरम्यान,स्थानिक गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकानेही समांतर तपास सुरू केला.तपास सुरू असतांनाच दोघेही भीसी येथे राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने संपर्क साधून त्यांना नागपुरात आणले.तपासात विद्यार्थिनी अल्पवयीन असतांनाच प्रज्ज्वल तिला फूस लावून घेऊन गेला.ती १८ वर्षाची झाल्यावर दोघांनी विवाह केला.गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने
समुपदेशनानंतर पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी दोघांनाही शांतीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.
विद्यार्थिनी घर सोडून गेली तेव्हा ती अल्पवयीन असल्याने नोंदविलेल्या अपहरणाच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तरूणाविरोधत कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, प्रकरणाचा पुढील तपास शांतीनगर पोलिस प्रशासन करीत आहे.सदरची कारवाई पोलिस उपायुक्त दीपक अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या प्रमुख पोलिस निरीक्षक संजिवनी थोरात यांच्या पथकाने केली.
- Advertisement -

