Monday, July 20, 2026
Homeगोंदियापोलिसांनी पकडले सुगंधीत तंबाखूचे मोठे १० पोते..

पोलिसांनी पकडले सुगंधीत तंबाखूचे मोठे १० पोते..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-सध्याच्या घडीला राज्याच्या विविध भागात अवैध सुगंधित तंबाखू,गुटखा व इतर मादक पदार्थ विक्री तथा त्याची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचा सपाटा सुरू असतांनाच गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील रोंढा गावाजवळील नाल्याजवळ
पोलिसांनी मोठी कारवाई करत सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्यांच्या मुसक्या आवळून सुगंधीत तंबाखूचे मोठे १० पोते जप्त केले.जप्त केलेल्या एकूण मालाची किंमत ८ लाख ५० हजार रुपये असून याप्रकरणी पिकअप वाहनचालक महेश सुशील नेवारे वय ४१ वर्षे,रा.बहेला,ता.लांजी,जि.बालाघाट(मध्य प्रदेश) व जगदीश लहुलाल भोयर वय ३८ वर्षे,रा.अंधियाटोला, ता.लांजी,जि.बालाघाट यांच्याविरुद्ध अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ नुसार सालेकसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बालाघाट जिल्ह्यातून एका पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनातून गोंदिया जिल्ह्यात अवैधरीत्या सुगंधित तंबाखूची खुलेआम वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती काल शुक्रवारी सालेकसा पोलिसांना मिळाली होती.मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सालेकसा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रवि नागोसे यांच्या नेतृत्वात पोलिस हवालदार तूरकर,पोलीस नाईक कान्सकर,पोलीस शिपाई वेदक व बैस यांनी एमएच ३५ एजे१०४२ क्रमांकाच्या पिकअप वाहनास रोंढा गावाजवळील नाल्याजवळ थांबवून वाहनाची तपासणी केली असता,त्यात १० मोठ्या पांढऱ्या रंगाचे पोत्यांमध्ये प्रत्येकी ५० नग आर.के.सुपर प्रीमियम क्वालिटी हुक्का सुगंधित तंबाखूचे पॅकेट,दोन हजार नग,आर.के.सुपर प्रीमियम क्वालिटी हुक्का सुगंधित तंबाखूचे पॅकेट,५० नग एम.डी सात सुपर प्रीमियम क्वालिटी हुक्का सुगंधित तंबाखूचे पॅकेट,एक हजार आर.के.सुपर प्रीमियम क्वालिटी हुक्का सुगंधित तंबाखूचे पॅकेट असा एकूण ८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रकरणी सदरच्या सुगंधित तंबाखूची विक्री कोठे करण्यात येणार होती व खरेदीदार कोण?याचा तपास सालेकसा पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कोणताही पात्र बांधकाम कामगार योजनांपासून वंचित राहू नये.. -प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर विशेष जनजागृती मोहीम राबवा- आमदार रामदास मसराम

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई अंतर्गत जिल्हा कामगार सुविधा केंद्र,गडचिरोली यांच्या वतीने आज,सोमवार २० जुलै रोजी देसाईगंज पंचायत समिती...

तब्बल ११७ आपले सरकार सेवा केंद्रांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात ११५ ग्रामपंचायत व दोन नगरपरिषद/नगरपंचायत स्तरावरील एकूण ११७ आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी १५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात...

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ विद्यार्थी उतरले रत्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-देशातील सध्याचे चित्र काही खरे नाही. अनेकजण आपली जबाबदारी व चूक मान्य करण्यास तयारच नाहीत.तुम्ही काहीही करा,आम्हाला कसलाही फरक पडणार नाही....

कारला ट्रकची ठोसर; भीषण अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर विरूळ परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तब्बल सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.यात कारमधील एका कुटुंबातील चार सदस्य,ट्रकचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!