- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-सोमवार २२ जून २०२६ रोजी सुरू झालेल्या महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची आज,शुक्रवार १० जुलै रोजी सांगता झाली.तब्बल १४ दिवस चाललेल्या अधिवेशन सत्रात अनेक महत्त्वाच्या लोककल्याणकारी विषयांवर सखोल चर्चा झाली. अधिवेशनाच्या आज शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी दोन्ही सभागृहांच्या प्रत्यक्ष कामकाजाची सांख्यिकीय माहिती पटलावर ठेवली.त्यानुसार,आगामी हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर २०२६ रोजी नागपुरात होणार आहे.विशेषतः विधानसभेत १४ दिवसांत एकूण १२७ तास ५४ मिनिटे प्रत्यक्ष कामकाज झाले.त्याची रोजची सरासरी ९ तास ८ मिनिटे इतकी होती.या सत्रात मंत्री उपस्थित नसल्यामुळे २५ मिनिटांचा,तर इतर कारणांमुळे ५ मिनिटांचा वेळ वाया गेला.विधानसभेत एकूण २२ शासकीय विधेयके पुनरःस्थापित करण्यात आली,त्यापैकी २१ विधेयके संमत करण्यात आली,तर १ विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्यात आले. अशासकीय १२ विधेयके चर्चेअंती मागे घेण्यात आली.तर दुसरीकडे,विधान परिषदेतही १४ दिवसांमध्ये १०१ तास १० मिनिटे प्रत्यक्ष कामकाज झाले आणि रोजची सरासरी ७ तास १३ मिनिटे राहिली.मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे ३५ मिनिटे,तर इतर कारणांमुळे ४० मिनिटे वाया गेली.विधान परिषदेत पुनरःस्थापित करण्यात आलेली सर्व ९ शासकीय विधेयके संमत करण्यात आली.तसेच विधानसभेतून मंजूर होऊन आलेली १८ विधेयकेही येथे पारित करण्यात आली आणि १ विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्यात आले.
- महाराष्ट्र विधानमंडळाचे सन २०२६ चे पावसाळी अधिवेशन: विधेयकांची माहिती
- दोन्ही सभागृहात मंजूर👇
- १.महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडतांना होणाऱ्या विलंबांस प्रतिबंध(सुधारणा)विधेयक, २०२६
- २.महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग (सुधारणा)विधेयक,२०२६
- ३.महाराष्ट्र वस्तू व सेवा कर(सुधारणा)विधेयक, २०२६
- ४.महाराष्ट्र (द्वितीय पुरवणी)विनियोजन विधेयक, २०२६
- ५.महाराष्ट्र खाजगी कौशल्यविद्यापीठे(स्थापना व विनियमन)(दुसरी सुधारणा)विधेयक, २०२६
- ६.महाराष्ट्र रोजगार हमी (सुधारणा)विधेयक, २०२६
- ७.महाराष्ट्र मुद्रांक(तिसरी सुधारणा)विधेयक,२०२६
- ८.महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ(तिसरी सुधारणा) विधेयक,२०२६
- ९.महाराष्ट्र ठेवीदारांच्या(वित्तीय संस्थामधील हिसंबंधाचे संरक्षण)(सुधारणा),विधेयक,२०२६
- १०.महाराष्ट्र औद्योगिक संबंध अधिनियम(निरसित) विधेयक,२०२६
- ११.महाराष्ट्र औद्योगिक विकास(सुधारणा)विधेयक, २०२६
- १२.महाराष्ट्र महानगरपालिका कायदे(सुधारणा) विधेयक,२०२६
- १३.महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग (सुधारणा)विधेयक,२०२६
- १४.महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ(चौथी सुधारणा) विधेयक,२०२६
- १५.सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठ (सुधारणा) विधेयक,२०२६
- १६.महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक,२०२६
- १७.महाराष्ट्र खाजगी विद्यापीठे(स्थापना व विनियमन) (दुसरी सुधारणा)विधेयक,२०२६
- १८.भारतीय नागरिक सुरक्षा संहिता(महाराष्ट्र सुधारणा)विधेयक,२०२६
- १९.महाराष्ट्र मुद्रांक(चौथी सुधारणा)विधेयक,२०२६
- २०.महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्र हॉटेल,उपाहारगृहे आणि मद्यपान कक्ष(बार रुम)यांमधील अश्लील नृत्यांवर प्रतिबंध घालण्याबाबत व(त्यामध्ये काम करणाऱ्या)महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत (सुधारणा)विधेयक,२०२६
- २१.महाराष्ट्र सहकारी संस्था(दुसरी सुधारणा) विधेयक,२०२६
- २२.महाराष्ट्र सावकारी(नियमन)(सुधारणा) विधेयक २०२६
- २३.महाराष्ट्र खाजगी विद्यापीठे(स्थापना व विनियमन) (तिसरी सुधारणा) विधेयक,२०२६ (वैद्यकिय अभ्यासक्रमाचा समावेश करणेबाबत)
- २४.महाराष्ट्र अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती, विमुक्त जाती,भटक्या जमाती,इतर मागासवर्ग व विशष मागासवर्ग(जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन)(सुधारणा)विधेयक, २०२६
- २५.डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (सुधारणा)विधेयक,२०२६
- २६.श्री राम मंदिर देवस्थान ट्रस्ट(रामटेक)विधेयक, २०२६
- २७.महाराष्ट्र फळ रोपवाटिका व फळझाडे विक्री (विनियमन)(सुधारणा)विधेयक,२०२६
- २८.महाराष्ट्र खाजगी कौशल्यविद्यापीठे(स्थापना व विनियमन)(तिसरी सुधारणा)विधेयक,२०२६
- २९.महाराष्ट्र खाजगी कौशल्यविद्यापीठे(स्थापना व विनियमन)(चौथी सुधारणा)विधेयक,२०२६
- ३०.महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास(सुधारणा) विधेयक,२०२६
- संयुक्त समितीकडे पाठविलेले विधेयके👇
•महाराष्ट्र चिकित्सा आस्थापना(नोंदणी व विनियमन) विधेयक,२०२६
- मागे घेण्यात आलेले विधेयके👇
•भारतीय नागरिक सुरक्षा संहिता(महाराष्ट्र सुधारणा) विधेयक,२०२६
- Advertisement -

