Friday, July 10, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज नगरीत जादूटोणा विरोधी कायदा व अंधश्रध्दा निर्मुलनाबाबत समाजप्रबोधन कार्यक्रम संपन्न..

देसाईगंज नगरीत जादूटोणा विरोधी कायदा व अंधश्रध्दा निर्मुलनाबाबत समाजप्रबोधन कार्यक्रम संपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-जादूटोणा विरोधी कायदा व अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत समाजामध्ये जनजागृती व प्रबोधन व्हावे,या उद्देशाने प्रबोधनकार श्रीकृष्णा शालीकराम धोटे श्री संत गाडगेबाबा विचार प्रबोधन बहुउद्देशीय संस्था,गाडगेनगर अमरावती यांचे समाजप्रबोधनपर कार्यक्रम गुरुवार ९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता देसाईगंज नगर परिषद सांस्कृतीक सभागृहात पार पडला.विशेष म्हणजे,गडचिरोली जिल्ह्याच्या ७ जुलै रोजी गडचिरोली,८ जुलै रोजी आरमोरी व ९ जुलै रोजी देसाईगंज नगरीत विशेष प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
देसाईगंज येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देसाईगंज नगर परिषदेच्या नगराध्यक्षा लताताई सुंदरकर,तर प्रमुख अतिथी म्हणून देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी,उपाध्यक्ष नरेश विठ्ठलानी,सभापती पाणीपूरवठा व जलनिसारण समिती सचिन खरकाटे, सभापती शिक्षण समिती बाळकृष्ण माडुरवार,सभापती नियोजन समिती पिंकू बावणे,नगरसेवीका राधीका पत्रे,मंदा समर्थ,पल्लवी मेंढे,पार्वता बेदरे,आशा दहिवले नगरसेवीका,भारती कुथे नगरसेवीका ईत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी प्रबोधनकार श्रीकृष्णा धोटे यांनी जादुटोणा विरोधी कायद्यातील प्रमुख तरतुदी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करुन समाजामध्ये असणारे भोंदूबाबा सर्वसामान्य जनतेस कशाप्रकारे फसवितात यांची माहिती विविध वैज्ञानिक प्रयोगाचे माध्यमातून समजावून सांगीतले.तसेच यापासुन सर्वसामान्य माणसाला कशाप्रकारे दुर ठेवता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.त्याचबरोबर,जादूटोणा व अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्याबाबत माहिती,अंधश्रद्धेचे दुष्परिणाम,वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज,समाजात विवेकवादी विचारांचा प्रसार तसेच नागरिकांची कायदेशीर जबाबदारी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक प्रकल्प अधिकारी लवकुश उरकुडे,तर आभार प्रदर्शन वरिष्ठ लिपीक दिनकर खेत्रे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता लेखापाल अविनाश राठोड,कर व प्रशासकिय अधिकारी प्रफुल हटवार,स्वप्नील हमाने,अभियंता सौरभ नंदनवार,प्रशांत चिचघरे,योगिता निंबार्ते, लिपीक रितेश येरणे,मुकेश सोनेकर,अनिता राजगूरु , नाजीमा पठाण,शहर समन्वयक प्रफुल दुपारे,समुदाय संघटक अरुण मोटघरे, जवाहर सोनेकर,व्यंकट चौधरी,घनश्याम कांबळे, सत्यवान कोडाप,रविंद्र सेंद्रे,राजू निंबेकर यांचेसह देसाईगंज नगर परिषदेच्या कर्मचारी वृंदांनी सहकार्य केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नो फ्लाइंग झोनमध्ये विनापरवानगी उडवला ड्रोन; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील मुधोली चेकपोस्ट परिसरात नो फ्लाइंग झोनमध्ये विनापरवानगी ड्रोन उडवल्याप्रकरणी आष्टी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.तसेच या घटनेदरम्यान...

देसाईगंज येथे आरपीआयची बैठक संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या खुल्या पत्रावर आधारित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हाच आंबेडकरी विचारांचा मुळ पक्ष असल्याने बाबासाहेबांची विचारधारा पुढे नेणे गरजेचे झाले आहे....

भीषण अपघातात मायलेकीसह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही तालुक्यातील पवनाचक गावातील मजुरांवर तेलंगणा राज्यातील रामगुंडम परिसरात काळाने घाला घातल्याने चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला,तर तब्बल २७ मजूर गंभीर...

वाघाचा हल्ला; ३० वर्षीय तरुण जिवानिशी गेला..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका ३० वर्षीय तरुणाचा वाघाच्या हल्ल्यात जीव गेल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी वन विभागातील पद्मापूर चक जंगल परिसरालगत असलेल्या कुरण गट...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!