Friday, July 10, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज येथे आरपीआयची बैठक संपन्न..

देसाईगंज येथे आरपीआयची बैठक संपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या खुल्या पत्रावर आधारित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हाच आंबेडकरी विचारांचा मुळ पक्ष असल्याने बाबासाहेबांची विचारधारा पुढे नेणे गरजेचे झाले आहे. इतर पक्षांचे काही खरे नाही,तुमचा-आमचा केवळ निवडणुकांपुरता वापर करून घेतात आणि काम संपले रे संपले की ओळख विसरून जातात.ही आजची स्थिती सर्वत्र उघडकीस येऊ लागल्याने आपणास बाबासाहेबांची विचारधारा पुढे नेत पक्ष संघटन बळकट करणे आवश्यक आहे; यासाठी सर्वांनी एकत्र येत सहकार्य करावे,अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन आरपीआयचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर यांनी आज,शुक्रवार १० जुलै रोजी देसाईगंज येथील रिपाई कार्यकार्यांच्या बैठकीत केले.
आज रिपब्लिकन पार्टीची बैठक मिलिंद बौद्ध विहार देसाईगंज येथे आरपिआयचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात प्रमुख अतिथी म्हणुन रिपाईचे प्रदेश सचिव गोपाल रायपुरे,गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष दशरथ साखरे, मारोती भैसारे,समता सैनिक दलाचे अभिमन्यु बन्सोड आदि लाभले होते.
याप्रंसगी गोपाल रायपूरे म्हणाले की,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी रिपाईसह चार मातृ संस्थाची स्थापना केली.या चारही संस्था सोबत राहुन आंबेडकरी समाजांनी संस्थाना मजबुत करण्याकरीता सक्रिय व्हावे.यात अभिमन्यु बन्सोड यांनी समता सैनिक दलाविषयी विश्वृत माहीती दिली.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिल्पा शेन्डे यांनी,तर संचालन विशाल मेंढे यांनी केले.तर उपस्थितांचे आभार पवन गेडाम यांनी मानले.
सदर बैठकीला रेवनाथ फुले,योगेश वानखेडे,सुरज लिंगायत,निलेश पिल्लेवान,निशा शिंपोंलकर,समता सैनिक दलाच्या खोब्रागडे,ममता वालदे,रेखा गणविर, मालता राऊत,प्रेमिला बोदेले,अक्का पिल्लेवान, सुंदराबाई चहांदे,चंद्रप्रभा मेश्राम,इंदुताई मेंढे,रंजना गायकवाड,
शुकेसना शेंन्डे,शिल्पा पिल्लेवान,बबिता मेश्राम,वैशाली बन्सोड,अर्चना कोडापे,सुनिता रामटेके,रेखा सोनडवले, यशोधरा मेश्राम,कल्पना आदि बौद्ध बांधवांसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज नगरीत जादूटोणा विरोधी कायदा व अंधश्रध्दा निर्मुलनाबाबत समाजप्रबोधन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-जादूटोणा विरोधी कायदा व अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत समाजामध्ये जनजागृती व प्रबोधन व्हावे,या उद्देशाने प्रबोधनकार श्रीकृष्णा शालीकराम धोटे श्री संत गाडगेबाबा विचार प्रबोधन बहुउद्देशीय...

नो फ्लाइंग झोनमध्ये विनापरवानगी उडवला ड्रोन; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील मुधोली चेकपोस्ट परिसरात नो फ्लाइंग झोनमध्ये विनापरवानगी ड्रोन उडवल्याप्रकरणी आष्टी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.तसेच या घटनेदरम्यान...

भीषण अपघातात मायलेकीसह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही तालुक्यातील पवनाचक गावातील मजुरांवर तेलंगणा राज्यातील रामगुंडम परिसरात काळाने घाला घातल्याने चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला,तर तब्बल २७ मजूर गंभीर...

वाघाचा हल्ला; ३० वर्षीय तरुण जिवानिशी गेला..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका ३० वर्षीय तरुणाचा वाघाच्या हल्ल्यात जीव गेल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी वन विभागातील पद्मापूर चक जंगल परिसरालगत असलेल्या कुरण गट...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!