Thursday, July 9, 2026
Homeवर्धालॉजमध्येच सुरू होता देहव्यापाराचा अड्डा; लॉज मालकाविरुद्ध गुन्हा दाखल..

लॉजमध्येच सुरू होता देहव्यापाराचा अड्डा; लॉज मालकाविरुद्ध गुन्हा दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
वर्धा :-नुकतेच चार दिवसांपूर्वी वर्धा शहराच्या कारला रोडलगत असलेल्या वैष्णवी कॉम्पलेक्स जवळील नखाते लेआऊट परिसरात स्वतःच्याच घरी देहव्यापाराचा अड्डा चालवणाऱ्या पती-पत्नीला पोलिसांनी रंगेहाथ अटक करून गुन्हा दाखल केल्याची घटना ताजी असतांनाच आता वर्धा जिल्ह्याच्या आर्वी शहरात एका लॉजमध्ये सुरू असलेल्या देहव्यापार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून या प्रकरणी लॉज मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आर्वी शहरातील बसस्थानक परिसरातील पुरुषोत्तम लॉजमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक लॉजमध्ये पाठविला.त्यावेळी लॉजमध्ये एक महिला उपस्थित असल्याचे आढळले.यानंतर पोलिसांनी लॉजवर छापा टाकला असता रूम क्रमांक-२०८ मध्ये संबंधित महिला व पोलिसांनी पाठविलेला बनावट ग्राहक आढळून आला. महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी त्या महिलेला ताब्यात घेतले.चौकशीत लॉजचा मालक पुरुषोत्तम मोहनदास रावलानी हा पीडित महिलेला आपल्या लॉजमध्ये बोलावून तिच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेत असल्याचे समोर आले. पोलिसांनी पंचासमक्ष घटनास्थळावरून रोख रक्कम व इतर साहित्य जप्त केले.तसेच १ जून ते ७ जुलै या कालावधीत लॉजमध्ये आलेल्या व्यक्तीची नोंद असलेले रजिस्टरही तपासण्यात आले.संबंधित महिलेला सुरक्षितपणे तिच्या घरी पाठविण्यात आले.आर्थिक फायद्यासाठी देहविक्रीचा व्यवसाय चालविल्या प्रकरणी लॉज मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

यांना म्हणतात खरे ‘लोकसेवक’..! आरोग्य उपकेंद्रात अचानकपणे मध्यरात्रीच धडकले जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कोणी कितीही मोठा अधिकारी कां असेना..! तो शासनाचा नोकर,तर जनतेचा लोकसेवक म्हणून शासनाकडून पगार घेतो.पण,काही अधिकारी स्वतःला मोठे अधिकारी समजून खुर्चीच्या...

गडचिरोली शहरासाठी २३ किलोमीटर लांबीचा चारपदरी बायपास रोड प्रस्तावित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीतील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शहरातील जड वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग व...

आता गावातील स्मशानभूमीचा दाखल द्या अन् विविध योजनेचा निधी मिळवा.. – ग्रामीण भागात तब्बल ७ हजार ४४४ गावांमध्ये स्मशानभूमीच नाही..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील ग्रामीण भागात आजही तब्बल ७ हजार ४४४ म्हणजेच जवळपास २० टक्के गावांमध्ये स्मशानभूमीच उपलब्ध नसल्याने पावसाळ्यात नागरिकांना मरणयातना सहन कराव्या...

इतर मागासवर्गीय समाजातील पात्र लाभार्थ्यांनी विविध कर्ज व व्याज परतावा योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-इतर मागासवर्गीय समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाचे जिल्हास्तरीय कामकाज आता...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!