- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध घेण्यासाठी गडचिरोली पोलिसांकडून सातत्याने विशेष मोहिमा राबवल्या जात होत्या.बापू व्यंकटी जनगम रा.नडीकुडा,ता.सिरोंचा,जि.गडचिरोली असे अटकेतील नक्षल समर्थक आरोपीचे नाव आहे.नक्षलवाद्यांना मदत करणाऱ्या ‘जनमिलिशिया’ संघटनेशी त्याचा संबंध होता. अटक करण्यात आलेला आरोपी बापू जनगम याचेवर खून,खुनाचा प्रयत्न आणि शासकीय सेवकांवर हल्ला यांसारख्या अनेक गंभीर गुन्हे असल्याने पोलीस त्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून होते.अश्यातच नुकतेच बुधवार,१७ जून २०२६ रोजी बापू जनगम हा त्याच्या गावी कुटुंबीयांना भेटणार असल्याची माहिती असरअल्ली पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार,नडीकुडा गावाला घेराव घालण्यात आला.दरम्यान,बापू जनगम हा परिसरातील शेतशिवारात लपून बसला. शोधमोहीमेदरम्यान त्यास अटक करण्यात आली.विशेष म्हणजे,बापू जनगम याचेविरुद्ध असरअल्ली पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये एकूण पाच गंभीर गुन्हे दाखल असून यात २०१५ मधील खुनाच्या एका गुन्ह्याचाही समावेश आहे.
- Advertisement -

