Tuesday, August 25, 2026
Homeचंद्रपूरहायवा ट्रकचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू..

हायवा ट्रकचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-एका अनियंत्रित हायवा ट्रकचा अपघात होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज, गुरुवार ११ जून रोजी पहाटेच्या सुमारास ब्रम्हपुरी तालुक्यातील पारडगाव नजिकच्या निलगिरी बारसमोर घडली. अपघातात ट्रकचा चालक सुरेश आनंदराव भुरले वय ३३ वर्षे,रा.मांडळ,ता.लाखांदूर, जि.भंडारा व सहकारी क्लिनर अमित देवराव कुमरे वय २९ वर्षे,रा.इरवा, ता.चिमूर,जि.चंद्रपूर या दोघांचा मृत्यू झाला.
आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास एमएच ४० सीडी ९००२ क्रमांकाचा हायवा ट्रक गिट्टीची वाहतूक करीत होता.ट्रक पारडगाव जवळ येताच चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गिट्टीने भरलेला ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल नाल्यात कोसळला.यात चालक व क्लिनर हे दोघेही ट्रकच्या समोरील केबिनमध्ये अडकून पडल्याने जागीच मृत पावले.घटनेची माहिती मिळताच ब्रम्हपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करत दोन्ही मृतदेह ट्रकचे केबिन कापून बाहेर काढण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यातील सर्व शासकिय,खाजगी व धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिटसह संबंधित यंत्रणांचे ऑडिट करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देतांना रुग्णालयांची सुरक्षा प्राधान्याची बाब आहे.राज्यातील सर्व शासकीय,खासगी व धर्मदाय आरोग्य संस्थांमधील...

५ टक्के दिव्यांग कल्याण निधीचा शंभर टक्के विनियोग करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.. – नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर दिव्यांग कल्याणासाठी राखीव निधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवावा. प्रलंबित UDID नोंदणी व वैद्यकीय तपासणी प्रक्रिया...

अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार जमा होण्याचा मार्ग मोकळा..

उद्रेक न्युज वृत्त :-रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.महायुती सरकारने माहे-जुलै-२०२६ च्या हप्त्याच्या...

रोजगारनिर्मितीला चालना..! तब्बल १ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील समृद्ध वनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करणे तसेच महिलांना आधुनिक काष्ठकलेचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या शाश्वत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!