Tuesday, June 9, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तप्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका.. आता नऊ सिलेंडरवर नाही; तर चारच सिलेंडरवर...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका.. आता नऊ सिलेंडरवर नाही; तर चारच सिलेंडरवर मिळणार अनुदान..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात रविवार ७ जून २०२६ पासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार, बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींनी हजारी पार केली आहे.अश्या परिस्थितीत केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठा झटका दिला आहे.विशेष म्हणजे,प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून वार्षिक ९ सिलेंडर आणि त्यावर प्रत्येकी ३०० रुपयांचे थेट लाभाचे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायचे.मात्र,आता अनुदान मिळणाऱ्या रिफिल सिलिंडरांची संख्या वर्षातील ९ वरून कमी करून ४ करण्यात आली आहे.उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना आता वर्षातील पहिल्या ४ रिफिल सिलिंडरवर प्रत्येकी ३०० रुपयांचे थेट लाभ हस्तांतरण(डीबीटी)मिळणार आहे.पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मते,उज्ज्वला योजनेतील एका कुटुंबाची सरासरी वार्षिक एलपीजी खपत सुमारे ४ रिफिल इतकी असल्याने अनुदानाची पात्रता त्यानुसार निश्चित करण्यात आली आहे.सुधारित निकष हे उज्ज्वला लाभार्थी कुटुंबांच्या प्रत्यक्ष सरासरी गॅस वापराचा विचार करून ठरविण्यात आले आहेत.सदरच्या निर्णयामुळे ५ सिलेंडरचा आर्थिक ताण उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांवर पडणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आधार पडताळणी करणे आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक शेतकरी गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती,अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव,यामुळे आर्थिक संकटाचा सामना...

येत्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन.. – समस्याग्रस्त व पीडित महिलांना वैयक्तिक तक्रारी आणि अडचणी मांडण्यासाठी व्यासपीठ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील महिलांच्या समस्या व तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन येत्या,सोमवार १५ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!