Wednesday, September 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तरखरखत्या उन्हात शेतातच टाकली खाट अन् उपोषणास केली सुरुवात..

रखरखत्या उन्हात शेतातच टाकली खाट अन् उपोषणास केली सुरुवात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसून आज,शनिवार ३० मे पासून सकाळी दहा वाजे जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी या त्यांच्या गावी रोडवरील शेतात खाट टाकून रखरखत्या उन्हात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.यावेळी ना मंडप..ना कुलर..थेट शेतशिवारात मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत.१६ मे २०२६ रोजी मराठा समन्वयक समितीची बैठक पार पडली होती.त्यावेळेस, आंदोलन सुरू व्हायच्या आधी सरकारने आंदोलनाबाबत योग्य ती कार्यवाही करावी.एकदा आंदोलन छेडले तर पुन्हा माघार घेणार नाही आणि आपण कुणाचेही ऐकणार नाही,अशी थेट भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली होती.सरकारने ३० तारखेच्या आत मराठा आरक्षणाबाबतच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात.३० तारखेनंतर सरकारसाठी वेळ वाढवून देणार नाही; असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले होते.अश्यातच आता आजपासून भर उन्हात आमरण उपोषणाला सुरुवात केल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे.तत्पूर्वी काल शुक्रवारी मनोज जरांगे पाटील यांची राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांनी भेट घेतली. दरम्यान,दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही संवाद साधून जरांगे पाटील यांनी केलेल्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.उपोषणाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात आंदोलनाचे पडसाद उमटू लागले असून मराठा समाज बांधवांनी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करून रास्तारोको आंदोलन सुरू केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!