Wednesday, May 13, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तरोजगार हमीचा तांत्रिक सहाय्यक सात हजारासाठी अडकला एसीबीच्या जाळ्यात..

रोजगार हमीचा तांत्रिक सहाय्यक सात हजारासाठी अडकला एसीबीच्या जाळ्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहीरीचे बांधकाम पुर्ण झाल्याने झालेल्या कामाच्या उर्वरीत अनुदानाची रक्कम काढण्यासाठी शाखा अभियंता व उप अभियंता यांची नावे पुढे करून स्वतः ७ हजाराची लाच स्विकारल्याप्रकरणी पंचायत समितीच्या रोजगार हमी योजना शाखेतील तांत्रिक सहाय्यकास धुळे जिल्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.विश्वजित संजय भामरे,वय ३१ वर्षे,तांत्रिक सहाय्यक,महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना,पंचायत समिती,धुळे असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की,तक्रारदार यांच्या भाऊ व वहिणीच्या नावे धुळे तालुक्यातील मौजा नंदाळे बु.येथे शेतजमीन असुन सदरची शेतजमीन तक्रारदार कसत आहे.सदर शेतजमीनीमध्ये तक्रारदार यांच्या वहिणीस महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत सन २०२३-२४ मध्ये विहिर खोदण्यासाठी ३ लाख ९९ हजार ६१० रुपये मंजुर झाले आहेत.सदर मंजुर झालेल्या विहीरीच्या अनुदानापैकी २ लाख ३९ हजार रुपये तक्रारदार यांच्या वहिणीस अदा करण्यात आले आहे.सदर विहीरीचे काम पुर्ण झाल्याने झालेल्या कामाच्या उर्वरीत अनुदानाची रक्कम मिळण्याकरीता तक्रारदार हे पाठपुरावा करीत होते.तक्रारदार यांनी ५ मे २०२६ रोजी पंचायत समिती,धुळे कार्यालयात जाऊन उर्वरीत अनुदानाच्या रकमेबाबत तांत्रिक सहाय्यक विश्वजित भामरे यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रारदार यांना विहिरीची मोजमाप पुस्तिका तपासणी करीता पुढे पाठविण्यासाठी शाखा अभियंता व उप अभियंता यांचेकरीता ७ हजार रुपये लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे कार्यालयात समक्ष हजर राहुन मंगळवार १२ मे २०२६ रोजी तक्रार दिली होती.
सदर तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता तांत्रिक सहाय्यक विश्वजित भामरे याने तक्रारदार यांच्याकडे स्वतः करीता तसेच वरिष्ठांकरीता ७ हजार रुपये लाचेची मागणी करुन लाच स्विकारण्याचे मान्य केले.त्यानंतर सापळा कारवाई दरम्यान तांत्रिक सहायक विश्वजित भामरे याने तक्रारदार यांचेकडुन ७ हजार रुपये लाचेची रक्कम पंचासमक्ष स्विकारली असता त्याला रंगेहात पकडण्यात आले.प्रकरणी त्याचेविरोधात देवपूर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ व ७-अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पर्यवेक्षण अधिकारी सचिन साळुंखे  पोलीस उप अधीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे,सापळा अधिकारी यशवंत बोरसे पोलीस निरीक्षक,ला.प्र.विभाग,धुळे,तपास अधिकारी पद्मावती कलाल पोलीस निरीक्षक,ला.प्र.विभाग,धुळे तसेच
सापळा पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल राजन कदम, मुकेश अहिरे,संतोष पावरा,प्रविण मोरे,पोलीस कॉन्स्टेबल मकरंद पाटील,प्रविण पाटील,सागर शिर्के,प्रितेश चौधरी, चंद्रकांत सैंदाणे,सागर माळी,मपोकॉ रेश्मा परदेशी, पोहेकॉ सुधीर मोरे,पोकॉ.जगदीश बडगुजर यांच्या पथकाने केली.
  •  नागरीकांना आवाहन👇
शासकिय,निम शासकिय अधिकारी,कर्मचारी अथवा खाजगी पंटर यांनी कामे करुन देण्याच्या नावाखाली
लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,धुळे येथे संपर्क साधावा.
संपर्क पत्ता – लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,धुळे
संकेतस्थळ -acbmaharashtra.gov.in
ईमेल- dyspacbdhule@gmail.com
टोलफ्री क्रमांक-१०६४
दुरध्वनी क्रमांक-०२५६२-२३४०२०
व्हॉटसॲप क्रमांक- ७७९८१६१०६४
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उपराजधानीत मध्य भारतातील सर्वात उंच भगवान बजरंगबलीच्या मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात मध्य भारतातील सर्वात उंच भगवान बजरंगबलीची(हनुमान)विराट आणि भव्य-दिव्य अशी मूर्ती तयार करण्यात येत असून नागपूरच्या कोराडी...

महिन्याला १८ हजार ५०० रुपये वेतन; फील्ड ऑफिसर पदांसाठी भरती.. – मुलाखतीद्वारे होणार निवड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच नोकरी देणारे व नोकरी शोधणारे यांना एकाच व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार...

मन सुन्न करणारी घटना..! पहिल्यांदा पत्नीची गळा चिरून हत्या व नंतर पतीनेही घेतला गळफास..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यात मन सुन्न करणारी घटना आज,मंगळवार १२ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.पहिल्यांदा पतीने ३५ वर्षीय पत्नीचा गळा चिरून...

अखेर गडचिरोली विमानतळाचा मार्ग मोकळा; जमीन संपादनासाठी १०४ कोटीच्या खर्चास मान्यता.. – शासन निर्णय निर्गमित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने व दूरदृष्टीतून गडचिरोली येथे विमानतळ उभारण्यात येत आहे.नियोजित विमानतळाच्या विकासासाठी शिरापूर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!