Monday, October 5, 2026
Homeगडचिरोलीअखेर गडचिरोली विमानतळाचा मार्ग मोकळा; जमीन संपादनासाठी १०४ कोटीच्या खर्चास मान्यता.. -...

अखेर गडचिरोली विमानतळाचा मार्ग मोकळा; जमीन संपादनासाठी १०४ कोटीच्या खर्चास मान्यता.. – शासन निर्णय निर्गमित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने व दूरदृष्टीतून गडचिरोली येथे विमानतळ उभारण्यात येत आहे.नियोजित विमानतळाच्या विकासासाठी शिरापूर चक,गुरुवळा,हिरापूर आणि राखी या गावांमधील सरकारी,खाजगी व वन विभागाच्या अखत्यारितील ३११.८१ हेक्टर आर जमीन संपादीत करण्यासाठी १०४ कोटी ४८ लाख ६४ हजार २३९ रुपयांच्या खर्चास राज्य शासनाने आज,मंगळवार १२ मे रोजी प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली आहे.
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने नियोजित गडचिरोली विमानतळासाठी शिरापूर चक,गुरुवळा, हिरापूर आणि राखी या गावांमधील सरकारी,खाजगी व वन विभागाची ३११.८१ हे.आर.जमीन संपादीत करण्याकरिता १०४ कोटी ४८ लाख ६४ हजार २३९ रुपयांच्या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील शक्ती प्रदत्त समितीच्या मान्यतेत ठेवला होता.या समितीच्या ८ मे २०२६ रोजी झालेल्या बैठकीत या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.त्यानुसार,सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भातील प्रशासकीय व वित्तीय मान्यतेचा शासन निर्णय निर्गमित केला आहे.या शासन निर्णयानुसार २४५.७५ हे.आर.खाजगी जमिनीच्या भूसंपादनासाठी ७६ कोटी ९९ लाख ७४ हजार ७९९ रुपयांच्या आणि ३४.६८ हे.आर.वन जमीन वळती करण्यासाठी १० कोटी ७ लाख ४५ हजार ४०० रुपयांच्या अशा एकूण ८७ कोटी ७ लाख २० हजार १९९ रुपयांच्या अंदाजित खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.उर्वरित रक्कमेत भूसंपादन कायदा २०१३ नुसार उपविभागीय अधिकारी यांचा ३ टक्के आस्थापना व ३ टक्के सोईसुविधा खर्च, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचा आस्थापना खर्च ४ टक्के आणि प्रकल्प खर्चात होणारी १० टक्के अंदाजित वाढ यांचा समावेश आहे.या शासन निर्णयानुसार गडचिरोली जिल्हाधिकारी यांनी ३१.३८ हे.आर.जमीन विनामोबदला महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला ३११.८१ हे.आर.जमीन संपादनासाठी भूसंपादन संस्था आणि अंमलबजावणी यंत्रणा म्हणून नियुक्त करण्यात येत असल्याचे तसेच जिल्हाधिकारी गडचिरोली यांना जमीन संपादनासाठी प्राधिकृत करण्यात आल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नितेश कराळे मास्तरांनी नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भरला उमेदवारी अर्ज..

उद्रेक न्युज वृत्त :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक,सामाजिक कार्यकर्ते तथा विदर्भातील वऱ्हाडी भाषेत स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणारे शिक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले कराळे मास्तर अर्थात नितेश...

मतदार यादी पुनरीक्षण; आता बीएलओ घरी जाऊन स्वीकारणार नोटीस प्राप्त मतदारांची कागदपत्रे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जुळवणी न झालेल्या किंवा जुळवणीत तार्किक विसंगती असलेल्या मतदारांना सुनावणीची नोटीस प्राप्त झाली असली,तरी निवडणूक...

बँकांनी कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना तगादा लावून नये; जीवाचे बरे वाईट केल्यास यंत्रणेला जबाबदार धरले जाईल- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने सरकारकडून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पीक कर्जवसुलीपासून दिलासा देण्यात आला आहे.अश्यातच काही बँका,पतसंस्था वा इतर वित्तसंस्था शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी...

लोखंडी पाईपांच्या आड गांजाची तस्करी; तिघांना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-लोखंडी पाईपांच्या आड लपवून आणलेला तब्बल ५०० किलो गांजाचा साठा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने(एनसीबी)नागपुरात जप्त केला.हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील स्कायलाइन ढाब्याजवळ पहाटेच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!