Monday, October 5, 2026
Homeगडचिरोलीबालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यातील मोफत प्रवेशासाठी शुल्क मागितल्यास करा...

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यातील मोफत प्रवेशासाठी शुल्क मागितल्यास करा शिक्षण विभागाकडे तक्रार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२(१)(सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश देण्यात येतो.या अंतर्गत शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर पालकांनी अर्ज केल्यानंतर लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या बालकांचे प्रवेश संबंधित शाळांमध्ये निश्चित करण्यात येतात.आरटीई(राईट टू एज्युकेशन)२५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेत निवड झालेल्या बालकांच्या सर्व कागदपत्रांची तपासणी करून अंतिम प्रवेश निश्चित केला जातो.मोफत प्रवेशांतर्गत प्रवेश घेतलेल्या बालकांचे शैक्षणिक शुल्क संबंधित शाळांना शासनाकडून अदा करण्यात येते.त्यामुळे अशा बालकांकडून कोणतेही शैक्षणिक शुल्क शाळांनी घेऊ नये,असे स्पष्ट करण्यात आले आहे.
आरटीई २५ टक्के अंतर्गत प्रवेश मिळालेल्या बालकांच्या पालकांकडून शाळा शैक्षणिक शुल्काची मागणी करीत असल्यास पालकांनी पुराव्यासह तात्काळ गटशिक्षणाधिकारी,जिल्हा नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.तसेच ९८२३०१२६९१ या संपर्क क्रमांकावर किंवा ssagadchiroli@gmail.com या ई-मेलवर तक्रार नोंदवावी.प्राप्त तक्रारींची चौकशी करून दोषी शाळांवर नियमानुसार प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल,असे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक)बाबासाहेब पवार यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नितेश कराळे मास्तरांनी नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भरला उमेदवारी अर्ज..

उद्रेक न्युज वृत्त :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक,सामाजिक कार्यकर्ते तथा विदर्भातील वऱ्हाडी भाषेत स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणारे शिक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले कराळे मास्तर अर्थात नितेश...

मतदार यादी पुनरीक्षण; आता बीएलओ घरी जाऊन स्वीकारणार नोटीस प्राप्त मतदारांची कागदपत्रे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जुळवणी न झालेल्या किंवा जुळवणीत तार्किक विसंगती असलेल्या मतदारांना सुनावणीची नोटीस प्राप्त झाली असली,तरी निवडणूक...

बँकांनी कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना तगादा लावून नये; जीवाचे बरे वाईट केल्यास यंत्रणेला जबाबदार धरले जाईल- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने सरकारकडून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पीक कर्जवसुलीपासून दिलासा देण्यात आला आहे.अश्यातच काही बँका,पतसंस्था वा इतर वित्तसंस्था शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी...

लोखंडी पाईपांच्या आड गांजाची तस्करी; तिघांना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-लोखंडी पाईपांच्या आड लपवून आणलेला तब्बल ५०० किलो गांजाचा साठा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने(एनसीबी)नागपुरात जप्त केला.हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील स्कायलाइन ढाब्याजवळ पहाटेच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!