Monday, May 11, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तयंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस; शेतकऱ्यांनी कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची निवड करण्याचा सल्ला..

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस; शेतकऱ्यांनी कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची निवड करण्याचा सल्ला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-यंदाच्या पावसाळ्याबाबत चिंता कायम आहे.हवामान विभागाने ‘अल निनो’ च्या प्रभावामुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आधीच अनेक पिकांचे नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.जर पावसाळ्यातही अशीच अनिश्चित परिस्थिती राहिली,तर त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना आधीपासूनच योग्य नियोजन करण्याचा सल्ला दिला आहे.कृषी विभागाने शेतकऱ्यांना एकाच पिकावर अवलंबून न राहण्याचा सल्ला दिला आहे.मिश्र पीक पद्धती,आंतरपीक आणि कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची निवड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन पीक नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.अनेक भागातील कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन सुरू केले आहे.कमी पावसाच्या परिस्थितीत उत्पादन टिकवण्यासाठी आधुनिक शेती पद्धतींचा वापर करण्यावरही भर दिला जात आहे.अश्यातच भारतीय हवामान विभागाने आज पुढील २४ तास विदर्भ आणि मराठवाड्यासाठी धोक्याचे असल्याचा इशारा दिला आहे.या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चालू कूलरला हात लावू नका; कूलरला हात लागताच तंटामुक्ती समिती अध्यक्षाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेकजण घरात कूलर लावून थंड हवा घेण्याचा प्रयत्न करतात.पण, तोच कूलर एखादेवेळी जीवघेणा ठरू शकतो.अशीच एक घटना गडचिरोली...

“वाघाने खाल्लन-वाघाने खाल्लन”; कोंढाळा येथे वाघाच्या अफवेने खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-सध्या वाघ आणि इतर हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात अनेकजण जीव गमावत आहेत. अश्यातच "वाघाने खाल्लन-वाघाने खाल्लन" अशी बोंब आज सोमवारच्या सकाळी दहा वाजेच्या...

अतिविषारी सापाचा दंश; महिलेचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-पहाटेच्या सुमारास घरगुती कामे करीत असतांना अतिविषारी सापाने हाताला दंश केल्याने एका २९ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज, रविवार...

कोंढाळा ग्रामपंचायतीला यवतमाळ जिल्ह्यातील मूल्यांकन समितीची भेट.. – पंचायतराज अभियानांतर्गत विकासकामांची पाहणी

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-मुख्यमंत्री-समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आज,रविवार १० मे रोजी देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा ग्रामपंचायतीला यवतमाळ जिल्ह्याच्या नेर तालुक्यातील पंचायत विभागाच्या मूल्यांकन समितीने भेट देत पंचायतराज अभियानातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!