Thursday, August 27, 2026
Homeभंडारापरीक्षेत अपयश; विद्यार्थ्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..

परीक्षेत अपयश; विद्यार्थ्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील रोंघा गावातील एका तरुणाने बारावी बोर्डाच्या परीक्षेत अपयश आल्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना काल शनिवारी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर घडली असून आज रविवारी सर्वत्र उघडकीस आली. नावेद(नवल)होलाराम खंडाते वय १८ वर्षे,रा.रोंघा असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण
मंडळाच्या बारावीचा काल शनिवारी निकाल जाहीर झाला.यात नावेद हा परीक्षेत नापास झाला.यामुळे तो मानसिक तणावात गेला.परीक्षेत नापास झाल्याची खंत उराशी बाळगून त्याने दुपारीच शेत गाठले आणि शेतातील झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच गोबरवाही पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.गोबरवाही पोलिस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.विशेष म्हणजे,विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करणे आवश्यक आहे.आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जिद्द,चिकाटी आणि मेहनतीची आवश्यकता असते. शिक्षण म्हणजे संपूर्ण आयुष्य नव्हे,तर यशाचा केवळ एक मार्ग आहे.अपयशावर मात करून यशस्वी व्यावसायिक किंवा मोठ्या हुद्‌द्यावर पोहोचलेली अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. त्यामुळे,आत्महत्या हा कोणत्याही संकटावरचा पर्याय वा उत्तर असूच शकत नाही.आठवी नापास विद्यार्थी पुढे शिकून आयपीएस अधिकारी बनतो,तर जिंकणे व हरणे हा जीवनातील नित्याचाच क्रम ठरवून पुढील भवितव्य घडवणे गरजेचे आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!