Wednesday, June 17, 2026
Homeकुरखेडाआता कुरखेडा व परिसरातील मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांना वेळेवर व दर्जेदार मिळणार उपचार.....

आता कुरखेडा व परिसरातील मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांना वेळेवर व दर्जेदार मिळणार उपचार.. “महाडायलिसिस” अंतर्गत कुरखेडा येथे अत्याधुनिक डायलिसिस केंद्राचे लोकार्पण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-सार्वजनिक आरोग्य विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या “महाडायलिसिस-स्वस्थ आरोग्याची हमी” या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक डायलिसिस केंद्राचे लोकार्पण उत्साहात पार पडले.या केंद्राचे उद्घाटन राज्याचे आरोग्य मंत्री  प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.यावेळी सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनीही दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहून या उपक्रमाचे कौतुक केले व नागरिकांनी या सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा,असे आवाहन केले.तसेच आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.छाया उईके यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास रुग्ण कल्याण समिती सदस्य तथा काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटील हरडे,कुरखेडा नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष अनिता बोरकर,रुग्ण कल्याण समिती सदस्य सिराज पठाण,व्यापारी संघटनेचे विवेक निरंकारी,नगरसेवक अशोक कंगाली, शहर विचार मंचचे जावेद शेख,उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमित ठमके,वैद्यकीय अधिकारी डॉ.सिन्हा,डॉ.कटरे, आयपीएचएस समन्वयक प्रवीण घुटके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी,वैद्यकीय अधिकारी,परिचारिका व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन सुरू करण्यात आलेले डायलिसिस केंद्र अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज असून प्रशिक्षित वैद्यकीय व तांत्रिक कर्मचाऱ्यांमार्फत सेवा देण्यात येणार आहे.मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांसाठी नियमित डायलिसिस ही अत्यावश्यक उपचार पद्धती असल्याने या केंद्रामुळे अशा रुग्णांना वेळेवर व दर्जेदार उपचार मिळणार आहेत.
या केंद्राच्या सुरूवातीमुळे कुरखेडा व परिसरातील मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांना आता जिल्ह्याबाहेर जाण्याची गरज भासणार नाही.स्थानिक स्तरावरच सुविधा उपलब्ध झाल्याने रुग्णांचा वेळ,आर्थिक खर्च व हालअपेष्टा मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत.
“महाडायलिसिस-स्वस्थ आरोग्याची हमी” हा उपक्रम ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना मोफत किंवा परवडणाऱ्या दरात डायलिसिस सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.कुरखेडा येथे सुरू झालेले हे केंद्र गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम करणारे ठरणार असून “सर्वांसाठी आरोग्य” ही शासनाची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार विभागाचे राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १८ जून...

डाटा एन्ट्री ऑपरेटरकडे चार हजार रुपये द्यायला सांगताच एसीबीची धाड; दोघेजण अडकले जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-मालमत्तेची नोंदणी करण्यासाठी गेलेल्या तक्रारदारास दुय्यम निबंधक कार्यालयातील दोन मालमत्तांच्या रजीस्ट्रीचे चार हजार रुपये लागतील,असे सांगून ते पैसे डाटा एन्ट्री ऑपरेटरकडे...

अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली; ‘या’ तारखेला येणार पीएम किसानचे दोन हजार खात्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी(PM-KISAN)योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दिला जाणारा २३ वा हप्ता हा येत्या,शनिवार २० जून २०२६ रोजी वितरित...

आता एमआरपीपेक्षा अधिक दराने खते विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासह परवाना रद्द करण्याची कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे,खते व कीटकनाशके वेळेत आणि योग्य दरात उपलब्ध व्हावीत,तसेच बोगस बियाणे विक्री,साठेबाजी आणि जादा दराने खतविक्रीच्या प्रकारांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!