Saturday, May 2, 2026
Homeपुणेबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात आला.राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला असून,दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.मुलींनी बाजी मारत ९३.१५ टक्के उत्तीर्णता मिळवली,तर मुलांचा निकाल ८६.८० टक्के लागला.गेल्या वर्षाच्या तुलनेत निकालात सुमारे २.०९ टक्क्यांची घट झाली आहे.शाखानिहाय निकालात विज्ञान शाखा ९६.४४ टक्क्यांसह अव्वल ठरली.वाणिज्य शाखेचा निकाल ८७.०३ टक्के,तर कला शाखेचा निकाल ७८.०२ टक्के लागला आहे.विभागनिहाय निकालात कोकण विभाग ९४.१४ टक्क्यांसह प्रथम क्रमांकावर आहे,तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी ८४.१४ टक्के आहे. राज्यातील ९ विभागात एकूण १४ लाख ३३ हजार ५७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.यातील १२ लाख ८६ हजार ८४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग आणि राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सदरची माहिती दिली.
  •  विभागनिहाय निकाल👇
  • पुणे- ९१.२५ टक्के
  • नागपूर- ८८.६७ टक्के
  • अमरावती- ९०.९२ टक्के
  • मुंबई- ९०.०८ टक्के
  • कोकण- ९४.१४ टक्के
  • नाशिक- ९०.७२ टक्के
  •  लातूर- ८४.१४ टक्के
  • छत्रपती संभाजीनगर- ८८.६८ टक्के
  • कोल्हापूर- ८९.९७ टक्के
खालील अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार असून निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्याचा सीट नंबर (Seat Number)आणि आईचे नाव(Mother’s First Name)साईटमध्ये दिलेल्या रकान्यात टाकून रिझल्ट पाहता येईल.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!