Tuesday, June 9, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा येथे वाचनसंस्कृतीला चालना देणारा ‘ग्रंथालय आपल्या द्वारी’ उपक्रम उत्साहात संपन्न..

कोंढाळा येथे वाचनसंस्कृतीला चालना देणारा ‘ग्रंथालय आपल्या द्वारी’ उपक्रम उत्साहात संपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(गडचिरोली):-जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून देसाईगंज येथील मोहसीनभाई जव्हेरी महाविद्यालयाच्या ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागातर्फे “ग्रंथालय आपल्या द्वारी” हा अभिनव उपक्रम आज, गुरुवार २३ एप्रिल रोजी कोंढाळा येथे उत्साहात पार पडला.या उपक्रमांतर्गत महापुरुषांवर आधारित ग्रंथप्रदर्शन आयोजित करून वाचनसंस्कृतीचा प्रसार व ज्ञानप्रबोधनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात आला.कार्यक्रमाचे उद्घाटन कोंढाळा ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचा तथा प्रशासक अपर्णा राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नरेंद्र आरेकर होते.प्रमुख अतिथी म्हणून नागपूर विभाग ग्रंथालय संचालनालयाचे अध्यक्ष भाऊराव पत्रे  उपस्थित होते.यावेळी बोलतांना अपर्णा राऊत म्हणाल्या, “ग्रंथालय घरापर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम ग्रामीण भागासाठी अत्यंत उपयुक्त असून,यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होईल.” अध्यक्षीय भाषणात डॉ.नरेंद्र आरेकर यांनी सांगितले की, “वाचन हीच खरी प्रगतीची किल्ली आहे. आजच्या काळात मोबाईलचा अतिरेकी वापर विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेवर परिणाम करत आहे.त्यामुळे वेळेचा योग्य उपयोग करून वाचनाची सवय जोपासणे अत्यंत आवश्यक आहे.” प्रमुख अतिथी भाऊराव पत्रे  यांनी मार्गदर्शन करतांना नमूद केले की, “आजच्या डिजिटल युगात पुस्तकांचे महत्त्व अधिक वाढले आहे. वाचनसंस्कृती टिकवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज अत्यंत अनिवार्य आहे.” कार्यक्रमाचे संयोजन ग्रंथालय व माहितीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.नजीम शेख यांनी केले.त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “‘ग्रंथालय आपल्या द्वारी’ हा उपक्रम केवळ पुस्तकांचा नाही,तर विचारांचा प्रवास आहे,जो समाजात ज्ञानाची नवी ज्योत प्रज्वलित करेल.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बुराडे यांनी केले,तर आभार प्रदर्शन डॉ.दीप्ती इंगोले यांनी मानले.
सदर कार्यक्रमास कोंढाळा ग्रामपंचायतीचे उपसरपंच तथा प्रशासक- सदस्य समितीचे गजानन सेलोटे,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हरिभाऊ पत्रे,पोलीस पाटील किरण कुंभलवार,वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन राउत,नलीना वालदे,मानसी चौधरी,ग्रंथालय सल्लागार समितीचे सदस्य डॉ.कुशल लांजेवार,प्रा.कृणाल हिवसे तसेच प्रा.सत्यनारायण पुसाला,डॉ.सुनील चौधरी, डॉ.आशिष सेलोकर,डॉ.रामकृष्णन येरोजवार,डॉ.सुचिता पेड्डीवार,प्रा.सचिन लोणारे,डॉ.गौरव निम्बार्ते,प्रा.प्रवीण पत्रे यांच्यासह,चंद्रकांत खोके,नंदकिशोर चहांदे,सतीश कोलावर,कपिल ढोरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते,
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका.. आता नऊ सिलेंडरवर नाही; तर चारच सिलेंडरवर मिळणार अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात रविवार ७ जून २०२६ पासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार, बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींनी...

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आधार पडताळणी करणे आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक शेतकरी गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती,अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव,यामुळे आर्थिक संकटाचा सामना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!