Sunday, October 4, 2026
Homeकुरखेडाआमदार मसरामांची मध्यरात्री उपजिल्हा रुग्णालयात धडक; स्वच्छतेबाबत नाराजी.. - रुग्ण व नातेवाईकांना...

आमदार मसरामांची मध्यरात्री उपजिल्हा रुग्णालयात धडक; स्वच्छतेबाबत नाराजी.. – रुग्ण व नातेवाईकांना सौजन्याची वागणूक देण्याची सूचना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयातील व्यवस्थेसंदर्भात नागरीकांच्या वारंवार होणाऱ्या तक्रारीची शहानिशा करण्याकरीता मंगळवार,२१ एप्रिलच्या मध्यरात्री आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी अचानकपणे रुग्णालयास भेट देत येथील व्यवस्थेची पाहणी केली.दरम्यान, रुग्णालयातील स्वच्छता व्यवस्थेसंदर्भात नाराजी व्यक्त करून मध्यरात्रीच रुग्णालय व्यवस्थापणाशी चर्चा केली.यावेळी रुग्णालयात असलेल्या स्वच्छतागृहांची व शौचालयांची नियमीत स्वच्छता करण्यात येत नसल्याने येथे तीव्र दुर्गंधी येत असल्याचे पाहणीत आढळून आल्याने त्यांनी नाराजी प्रकट केली.तसेच आंतररुग्ण विभागात कुलरची व्यवस्था असतांनाही कुलर लावण्यात आले नसल्याने दाखल रुग्ण उकाड्याने त्रस्त होतांना दिसून आले.प्रकरणी तात्काळ कुलर लावण्याच्या सूचना केल्या.
त्याचबरोबर,रुग्णालयातील व्यवस्थापन सामान्य
रुग्णांना अरेरावीची वागणूक देत असणाऱ्या तक्रारीची दखल घेत रुग्ण व त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांना सौजन्याची वागणूक देण्याची सूचना आमदार मसरामांनी केली.रुग्णालयात आवश्यक औषधांचा साठा तसेच नियमित तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले व रुग्णालयात मंजूर डायलिसिस सेंटर करीता यंत्र सामुग्री व तज्ञांची नेमणूक झाली आहे; त्यामुळे विलंब न करता डायलिसिस सेंटर सुरू करण्याची सूचना केली.याप्रसंगी वैद्यकीय अधिक्षक डॉ.अमीत ठमके, रुग्ण कल्याण समिती सदस्य जयंत हरडे,उध्दव सेनेचे तालुकाप्रमुख तथा नगरसेवक आशिष काळे,रुग्ण कल्याण समिती सदस्य सिराज पठाण, सामाजिक कार्यकर्ते धनपाल मिसार,माजी नगरसेवक उस्मान पठाण,भावेश मुंगणकर,आसिफ शेख,राकेश चव्हाण, सागर वाढई यांचेसह वैद्यकीय अधिकारी मिथेलेश आत्राम आदी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

हातातोंडाशी आलेले पीक जंगली हत्तींमुळे उद्ध्वस्त; शेतकरी चिंताग्रस्त..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जंगली हत्तींचा कळप ऐन निसाव्यावर आलेल्या धानपिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस करीत असल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत. अश्यातच गेल्या तीन दिवसांपासून जंगली...

भरधाव ट्रेलरची दुचाकीला जोरदार धडक; पती-पत्नी व चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरहून बुटीबोरीकडे दुचाकीने निघालेल्या कुटुंबियांवर काळाने घाला घालून दुचाकीवरील पती, पत्नी व अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्याचा करून अंत झाला.तर त्यांचा ६...

धावत्या पिकअप वाहनाचा अपघात; नऊ जण गंभीर जखमी,तर आठ जण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त :-पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर जिल्ह्यात निघालेल्या मजुरांच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना आज,शनिवार ३ ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिस...

काँग्रेसकडून विधान परिषद निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा.. -नागपूर पदवीधर मतदार संघासाठी अभिजीत वंजारी यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा  केली.यामध्ये नागपूर पदवीधर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!