Wednesday, August 19, 2026
Homeगडचिरोलीवनपट्टेधारक शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी.. - ॲग्रिस्टॅक अंतर्गत ‘फार्मर आयडी’ नोंदणी प्रक्रिया...

वनपट्टेधारक शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी.. – ॲग्रिस्टॅक अंतर्गत ‘फार्मर आयडी’ नोंदणी प्रक्रिया सुरू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील वनपट्टेधारक शेतकऱ्यांना ॲग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक(फार्मर आयडी)देण्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून,सर्व पात्र लाभार्थ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी लवकरात लवकर ई-केवायसी करून ही प्रक्रिया पूर्ण करावी,असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार वनपट्टेधारकांची नावे ७/१२ उताऱ्यात ‘इतर हक्क’ या स्तंभाखाली नोंद असल्यामुळे त्यांना पूर्वी फार्मर आयडी मिळण्यात अडचणी येत होत्या.मात्र,शासनाने विशेष निर्णय घेतल्यामुळे आता वनपट्टेधारकांनाही फार्मर आयडी देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
नोंदणीसाठी https://mhfr.agristack.gov.in या पोर्टलवर किंवा “Farmer Registry MH” मोबाईल ॲपद्वारे प्रक्रिया करता येते.तसेच नागरिकांनी आपल्या जवळच्या सेतू केंद्रावर(CSC)जाऊनही नोंदणी करून घ्यावी.या प्रक्रियेत आधार क्रमांकाद्वारे ओटीपी किंवा बायोमेट्रिक पडताळणी करून ई-केवायसी करणे आवश्यक आहे.
नोंदणी प्रक्रियेत ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतर जमीन संलग्नता  व ई-साईन करून अर्ज सादर केला जातो. त्यानंतर २४ ते ४८ तासांत फार्मर आयडी तयार होऊन लाभार्थ्यांच्या मोबाईलवर संदेशाद्वारे पाठविला जातो.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सर्व संबंधित यंत्रणांना या प्रक्रियेसाठी समन्वय ठेवून काम करण्याच्या सूचना दिल्या असून,वनपट्टेधारक शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन तात्काळ ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून फार्मर आयडी  मिळवावी व विविध शासकीय योजनांचे लाभ घ्यावे, असे आवाहन केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! आश्रमशाळेच्या शिपायाकडून दोन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील कोंढाळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पुसागोंदी येथील एका निवासी आश्रमशाळेत धक्कादायक घटना समोर आली आहे.चक्क शिपायाकडून(नाइट वॉचमन)दोन विद्यार्थ्यांच्या लैंगिक शोषणाची...

देसाईगंज एमएसडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांना विविध संस्था भेटीतून सामाजिक कार्याचे मोलाचे मार्गदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने नुकतेच एम.एस.डब्ल्यू.(समाजकार्य पदव्युत्तर पदवी) अभ्यासक्रमाच्या १२० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांसाठी विविध सामाजिक संस्थांना संस्था भेटीचे आयोजन करण्यात आले.या भेटीदरम्यान...

विजेचा जोरदार शॉक; दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त पुणे :-घराजवळ असणाऱ्या जनावरांच्या गोठ्याजवळ विजेचा जोरदार शॉक लागून दोन सख्ख्या चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,बुधवार १९ ऑगस्ट रोजी सकाळी...

खुद्द पत्नीनेच प्रियकर दिराच्या मदतीने पतीचा काढला काटा.. -अनैतिक संबंधाचा बिन भाड्याच्या खोलीत ‘दी एंड’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-अनैतिक संबंधात आडकाठी येणाऱ्या पतीचा खुद्द पत्नीनेच प्रियकर चुलत दिराच्या मदतीने काटा काढल्याची घटना वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील वडनेर पोलिस ठाण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!