Sunday, May 31, 2026
Homeनागपूरखोटी बातमी प्रसारित केल्याप्रकरणी दोन यू-ट्यूब चॅनल्सविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल..

खोटी बातमी प्रसारित केल्याप्रकरणी दोन यू-ट्यूब चॅनल्सविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-शहराच्या गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वर्दळीच्या दोसरभवनचौक परिसरात डॉ.उज्वल लांजेवार यांच्या इमारतीच्या खुल्या जागेमध्ये मंगळवार,७ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास संशयास्पद स्फोटके आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.एका बेवारस बॅगेत ५० डिटोनेटर्स आणि जिलेटिनच्या १५ कांड्या आढळून आल्या होत्या. दोसरभवन मेट्रो स्थानकाच्या मागील एका घराच्या मोकळ्या जागेत काही दिवसांपासून ही बॅग पडली होती.घरमालक डॉ. लांजेवार यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर या प्रकाराचा खुलासा झाला.या घटनेनंतर शहर पोलिस यंत्रणा हायअलर्टवर गेली.डॉ.लांजेवार यांच्या तक्रारीवरून गुन्हादेखील दाखल करण्यात आला. आढळलेल्या स्फोटकांनंतर खळबळ उडाली असतांना दोन यू-ट्यूब चॅनलच्या पत्रकारांनी सामाजिक सौहार्द बिघडविणारी खोटी बातमी प्रसारित केली.यामुळे आणखी तणाव वाढला.सदरचा प्रकार हा तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला होता.न्यूज एक्स्प्रेस व न्यूज भारत टीव्ही या दोन यू-ट्यूब चॅनलने संबंधित स्फोटके एका प्रार्थनास्थळ परिसरात आढळल्याचा दावा करत बातमी प्रसारित केली.त्यांनी तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील त्या नामांकित प्रार्थनास्थळाचा फोटो व त्याखाली स्फोटके दाखवून ती बातमी प्रसारित केली. यामुळे संबंधित परिसरातील नागरिकांच्या भावना दुखावल्या.त्यातील मोमिनपुरा येथील ५४ वर्षीय साजीद अन्वर यांनी तहसील पोलिस ठाण्यात तक्रार केली व धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला.प्रकरणी पोलिसांनी दोन्ही चॅनेल्सविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

हाताची दोन बोटे दाखवून सेल्फी काढत असाल तर सावधान..!

उद्रेक न्युज वृत्त :-डिजिटल युगात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे.काही कालावधीपासून डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांची फसवणूक...

‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ व ‘उच्चरक्तदाब दिना’ निमित्त पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' आणि 'जागतिक उच्चरक्तदाब दिना'चे औचित्य साधून गडचिरोली येथे एक विशेष आरोग्य जनजागृती आणि तपासणी शिबिर उत्साहात पार...

कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा; स्वतःचीच दोन मुले विकली दोन लाखात.. – अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-काही कालावधीपासून चंद्रपूर जिल्ह्यात खतरनाक कारनामे उघडकीस येऊ लागलेत.विविध कारनामे उघड होत असतांनाच नुकताच एका कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा...

आदिवासी महामंडळाच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकरी संकटात; रब्बीची धान खरेदी केंद्रे अद्याप बंदच.. – गोदामे जुन्याच धानाने गच्च भरलेली..

उद्रेक न्युज वृत्त  गौरव नागपूरकर/देसाईगंज :-रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाची खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने देसाईगंज(वडसा)परिसरासह गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकरी तीव्र चिंतेत सापडले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!