- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने अर्थात एसटी प्रशासनाने तिकीट दरात हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.सदरची वाढ ही येत्या, मंगळवार १४ एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर लागू होणार आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटी महामंडळाला सणासुदीच्या आणि गर्दीच्या काळात ३० टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्यास मंजुरी दिली आहे.मात्र,यंदाच्या उन्हाळी हंगामासाठी दहा टक्के भाडेवाढ लागू करण्यात आली आहे.बसस्थानके,बसगाड्या आणि आगार स्वच्छ ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याने प्रत्येक तिकिटावर २ रुपये स्वच्छता अधिभार आकारला जाणार आहे.महिला सन्मान योजना,ज्येष्ठ नागरिक आणि इतर सवलतधारक प्रवाशांनाही हा स्वच्छता अधिभार लागू असेल.त्यामुळे सर्व प्रवाशांवर या वाढीचा परिणाम होणार आहे. ‘आवडेल तिथे प्रवास’ योजनेअंतर्गत चार आणि सात दिवसांच्या पासवर ५ रुपये अधिभार आकारला जाणार आहे.मात्र,आगाऊ आरक्षणातून घेतलेल्या पासवर हा अधिभार लागू नसेल.तसेच बस भाड्याने घेणाऱ्यांना प्रति बस ५० रुपये अधिभार द्यावा लागणार आहे.अश्यातच काही महत्त्वाच्या मार्गावरील नवे तिकिट दर- मुंबई ते पुणे-२८२ वरून ३१४ रुपये तिकीट दर,मुंबई ते नाशिक-३२३ वरून ३५९ रुपये, मुंबई ते कोल्हापूर-७५० वरून आता ८२५ रुपये,
परळ ते कोल्हापूर-६४० वरून ७०४ रुपये,मुंबई ते चिपळूण- ४५३ वरून ५०२ रुपये,मुंबई ते लातूर – ९०० वरून १००० रुपये,मुंबई ते रत्नागिरी- ६०० वरून ७०० रुपये तिकीट दर तर मुंबई ते अलिबाग- १८२ ऐवजी २०४ रुपये.ही भाडेवाढ साधी बस,मिडी बस,जलद सेवा आणि रात्रसेवा देणाऱ्या गाड्यांसाठी लागू असेल.मात्र शिवनेरी,शिवशाही,जनशिवनेरी, हिरकणी,शयनयान आणि ई-बस सेवांना या दार वाढीतून वगळण्यात आले आहे.
- Advertisement -

