Friday, July 10, 2026
Homeकुरखेडाअचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात होऊन अंगावर वीज कडाडली; तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू..

अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात होऊन अंगावर वीज कडाडली; तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-सध्या राज्याच्या विविध भागात उन आणि अवकाळी पावसाचा खेळ सुरू आहे. वातावरणात बदल आणि वादळी वाऱ्यासह पावसाला केव्हा सुरुवात होईल,हे सांगताच येत नाही.अश्याच प्रकारे गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील रामगड परिसरात अचानक वातावरणात बदल झाला आणि वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात होऊन विजांचे कडकडाट सुरू झाले.दरम्यान, डेकोरेशनचे मजूर म्हणून काम करणाऱ्या एका १६ वर्षीय तरुणाच्या अंगावर वीज कोसळली.यात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,रविवार ५ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास रामगड येथे घडली. दिशांत रेवाराम सतीमेश्राम वय १६ वर्षे,रा.मुरमाडी/पारडी,ता.लाखांदूर,जि.भंडारा असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
माहितीनुसार,कुरखेडा तालुक्याच्या रामगड येथील ईश्वर मेश्राम यांच्या मुलीच्या विवाहाचा कार्यक्रम असल्याने आज सकाळच्या सुमारास डेकोरेशनचे काम सुरू होते.अश्यातच दिशांत हा रामगड येथील गणेश डेकोरेशन मध्ये मजूर म्हणून कामावर होता.आज सकाळी तो कामावर असतांनाच वातावरणात बदल होत आकाशात ढग गोळा झाले व विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.या दरम्यान दिशांतच्या अंगावर वीज पडल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच पुराडा येथील पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व शव ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला.एका मजूर म्हणून काम करणाऱ्या तरुणावर काळाने अचानकपणे झडप घातल्याने कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींचा वावर.. – रील आणि फोटोंच्या नादात जीव धोक्यात घालू नका-उपवनसंरक्षक गडचिरोली

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली वनविभागात,विशेषतः गडचिरोली वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींचा वावर आहे.मनुष्य आणि हत्ती यांच्यात कोणताही अनुचित प्रकार किंवा संघर्ष होऊ नये,यासाठी...

संशय आल्याने दहा हजार घेण्यास नकार; पण तरीही गुन्हा दाखल.. -पोलीस हवालदारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दाखल गुन्ह्यातील गुन्ह्याचे स्वरूप कमी करून तपासात मदत करण्याच्या नावाखाली दहा हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविणाऱ्या एका पोलीस हवालदारावर भंडारा...

यांना म्हणतात खरे ‘लोकसेवक’..! आरोग्य उपकेंद्रात अचानकपणे मध्यरात्रीच धडकले जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कोणी कितीही मोठा अधिकारी कां असेना..! तो शासनाचा नोकर,तर जनतेचा लोकसेवक म्हणून शासनाकडून पगार घेतो.पण,काही अधिकारी स्वतःला मोठे अधिकारी समजून खुर्चीच्या...

गडचिरोली शहरासाठी २३ किलोमीटर लांबीचा चारपदरी बायपास रोड प्रस्तावित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीतील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शहरातील जड वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!