Thursday, July 30, 2026
Homeभंडाराबेपत्ता असलेल्या दोन चिमुकल्यांचे डबक्यात सापडले मृतदेह..

बेपत्ता असलेल्या दोन चिमुकल्यांचे डबक्यात सापडले मृतदेह..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-बेपत्ता असलेल्या दोन चिमुकल्यांचे मृतदेह चक्क गावनजीकच्या पाण्याच्या डबक्यात आढळून आल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळून परिसरात शोककळा पसरल्याची घटना आज,बुधवार १ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील रोंघा गावात उघडकीस आली.सार्थक संजय उईके वय ६ वर्षे व चंद्रपाल रुपचंद कुंभरे वय ७ वर्षे अशी मृतक चिमुकल्यांची नावे असून दोघेही काल, मंगळवार ३१ मार्चच्या सायंकाळपासून बेपत्ता होते.
रोंघा गावातील सार्थक व चंद्रपाल दिवसभर घराशेजारी खेळत होते.अश्यातच सायंकाळच्या सुमारास दोघेही घरी न परतल्याने कुटुंबियांनी चिंता व्यक्त करून सर्वत्र शोधाशोध सुरू केली.मात्र,दोघांचा कुठेही थांगपत्ता लागलेला नव्हता.रात्रीच्या वेळेस तसेच आज सकाळच्या सुमारास शोध मोहीम सुरू असतांनाच गावातील काही नागरिकांना गावनजीकच्या पाण्याच्या डबक्यात दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह तरंगताना दिसून आले.घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच गावकऱ्यांनी तसेच कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली.मृतदेह पाहून दोन्ही कुटुंबीयांचे अश्रू अनावर झाले.घटनेची माहिती पोलीस प्रशासनास तसेच संबंधित प्रशासकीय यंत्रणांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.दोन्ही चिमुकल्यांचा मृत्यू नेमका कसा झाला,हे उत्तरीय तपासणीअंती स्पष्ट होणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज येथे स्काऊट-गाईड विषयावरील मार्गदर्शन व उजळणी वर्ग उत्साहात संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-भारत स्काऊट-गाईड्स जिल्हा कार्यालय गडचिरोली व जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक/माध्यमिक)गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच राजर्षी शाहू महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक...

आईसह दोन चिमुकल्या नदी व नाल्याच्या मधोमध अडकून पडल्या; धाडसी बचावकार्य..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात काल बुधवारी दिवसभर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पामुलगौतम नदीसह परिसरातील नाल्यांना अचानक पूर आल्याने लाहेरी येथील एकाच कुटुंबातील तीन...

तुकाराम मुंढेंनी शाळा व्यवस्थापनावर सोपवली मोठी जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विविध निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असतांनाच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!