Wednesday, July 15, 2026
Homeनागपूरमित्रांसोबत नदी पात्रात आंघोळीसाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू..

मित्रांसोबत नदी पात्रात आंघोळीसाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-जिल्ह्याच्या पारशिवनी तालुक्यातील कन्हान नदीच्या पात्रात मित्रांसोबत आंघोळ करतांना एका १३ वर्षीय विद्यार्थ्याचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना काल सोमवारच्या सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.लक्की शंकर बोपचे वय १३ वर्षे,रा.शिवनगर, गल्ली क्रमांक-४,कन्हान,ता.पारशिवनी,जि.नागपूर असे नदीत बुडून मृत पावलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो कन्हान येथील धर्मराज विद्यालयात इयत्ता आठव्या वर्गात शिक्षण घेत होता.
सोमवारच्या सायंकाळी लक्की हा त्याच्या चार मित्रांसह कन्हान शहरालगत वाहणाऱ्या कन्हान नदीच्या तीरावर फिरायला गेला होता.सर्व मित्र नदीपात्रात आंघोळ करू लागल्याने लक्कीदेखील पाण्यात उतरला.काही वेळाने खोल पाण्यात गेल्याने तसेच पोहता येत नसल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला.लक्की गटांगळ्यात खात बुडत असल्याचे लक्षात येताच त्याचे सर्व मित्र जोरजोरात आरडाओरड करीत नदीच्या काठावर आले.क्षणात लक्की पाण्यात दिसेनासा झाला.माहिती मिळताच ठाणेदार वैजयंती मांडवधरे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून स्थानिकांच्या मदतीने त्याचा पाण्यात शोध घेतला.काही वेळात त्याचा मृतदेह शोधण्यात यश आले. लक्कीला पण्याबाहेर काढून तातडीने कामठी उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.घटनेच्या दिवशी लक्कीचे आई-वडील लग्नासाठी गोंदियाला गेले होते.दुर्घटनेची माहिती मिळताच ते तातडीने कामठी येथे पोहोचले, रुग्णालयात मुलाचा मृतदेह पाहताच आई-वडील आणि बहिणीने हंबरडा फोडला.दरम्यान,पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बांधकाम कामगारांसाठी मोठा निर्णय; कामगारांना मिळणाऱ्या लाभ रकमेत वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांसाठी मोठा आणि महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मंडळाच्या चार प्रमुख कल्याणकारी...

अज्ञात वाहनाची बिबट्याला धडक; बिबट्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला एका भरधाव वेगात असलेल्या अज्ञात वाहनाने जोरात धडक दिल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन  बिबट्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना...

मधमाशी पालन केंद्र योजना; ५० टक्के अनुदानासह मधाला हमीभावाची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करून शेतकरी व युवकांना शाश्वत उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत 'मध...

राज्याच्या विविध भागात पाऊस करणार दमदार एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त :- 'नैसर्गिक आपत्तीस मंडळ जबाबदार राहणार नाही' अश्या म्हणण्याप्रमाणे पावसाचे काही खरे नाही.कुठे मुसळधार पडतो तर कुठे पाण्याचा एक थेंबही पडत नाही.त्यातच...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!