Wednesday, September 2, 2026
Homeगडचिरोलीआता खेळाडूंना घरबसल्या मिळवता येणार डिजिटल क्रीडा प्रमाणपत्र..

आता खेळाडूंना घरबसल्या मिळवता येणार डिजिटल क्रीडा प्रमाणपत्र..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाराष्ट्रातील गुणवंत खेळाडूंना शासकीय व निमशासकीय सेवांमधील ५ टक्के आरक्षणाचा लाभ अधिक सुलभ व पारदर्शक पद्धतीने मिळावा यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित ‘क्रीडा ई-प्रमाण’ ही अत्याधुनिक डिजिटल प्रणाली सुरू केली आहे.या प्रणालीद्वारे खेळाडूंना घरबसल्या ऑनलाइन नोंदणी करून आपले डिजिटल क्रीडा प्रमाणपत्र प्राप्त करता येणार आहे. माहिती भरल्यानंतर मूळ अभिलेखाशी पडताळणी झाल्यास अवघ्या २४ तासांत डिजिटल पडताळणी अहवाल उपलब्ध होतो. प्रत्येक प्रमाणपत्रावर क्यूआर कोड असणार असून नियुक्ती प्राधिकाऱ्यांना त्याची सत्यता त्वरित तपासता येईल.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग(MPSC)तसेच इतर सर्व शासकीय भरती प्रक्रियेत खेळाडू संवर्गातून अर्ज करतांना ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’ जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे.यापूर्वी क्रीडा विभागाकडून पडताळणी केलेल्या खेळाडूंनाही या प्रणालीद्वारे प्रमाणपत्र तयार करून घ्यावे लागणार आहे.
खेळाडूंनी https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन 5% Reservation या टॅबमध्ये नोंदणी करून आधार-संलग्न मोबाईल क्रमांक,ईमेल आयडी,आधार कार्ड आणि क्रीडा स्पर्धेचे प्रमाणपत्र अपलोड करावे.
कबड्डी,फेन्सिंग,ट्रायथलॉन(२०२५),ज्युडो (२०२४) आणि कुराश (२०१७-१८ व २०२४-२५) या स्पर्धांचे अभिलेख सध्या प्रणालीवर उपलब्ध असून संबंधित खेळाडूंनी त्वरित अर्ज करावा.इतर खेळांचे अभिलेख टप्प्याटप्प्याने अपलोड करण्यात येत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!