Tuesday, September 1, 2026
Homeगडचिरोलीप्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार; आरोपी तरुणास बेड्या..

प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार; आरोपी तरुणास बेड्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-एका अल्पवयीन मुलीला २५ वर्षीय तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात ओढले.नंतर तिचा विश्वास संपादन करून आपण लग्न करू म्हणून वारंवार लैंगिक संबंध प्रस्थापित केले.यात ती गर्भवती राहिली.प्रकरणी कोरची पोलिसांनी काल बुधवारी आरोपी तरुणास बेड्या ठोकून भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२)(एम), ६४(२)(आय) व पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.सदरची घटना ही गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुक्यात उघडकीस आली असून अजय टिल्लू कल्लो वय २५ वर्षे,रा.जांभळी,ता.कोरची, जि.गडचिरोली असे आरोपी तरुणाचे नाव आहे.
आरोपी अजयने अल्पवयीन मुलीला वर्षभरापूर्वी प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि लग्नाचे आमिष दाखवत राहिला.या दरम्यान त्याने अनेकदा तिच्यावर अत्याचार केला.यामुळे ती तीन महिन्यांची गर्भवती राहिली. त्यानंतर,तिने कोरची पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली. बोटेकसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन दिलेल्या वैद्यकीय अहवालात ती गर्भवती असल्याचे निष्पन्न होताच कोरची पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.प्रकरणाचा पुढील तपास कोरची पोलीस ठाण्याचे ठाणेदार शैलेंद्र ठाकरे करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!