Friday, July 31, 2026
Homeभंडाराबापरे..! वय पाहली छटाकभर अन् कार्य दाखवले मस्तीचे.. - टोळीवर संघटित गुन्हेगारी...

बापरे..! वय पाहली छटाकभर अन् कार्य दाखवले मस्तीचे.. – टोळीवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारवाई..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-ज्या वयात करियरकडे लक्ष देणे गरजेचे असते; अश्या वयात हातात लाठ्या,काठ्या,छुरे,
बीचवे घेऊन अधिराज्य गाजवू पाहणाऱ्या टोळीवर पोलिसांनी “मकोका” अंतर्गत कारवाईचा फास आवळला आहे.यासंदर्भात भंडारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी मकोका कायद्यांतर्गत पाठविलेल्या प्रस्तावाला नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी मान्यता देताच टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्या अंतर्गत (मकोका)कारवाई करण्यात आली आहे.विशेष म्हणजे, टोळीतील सर्व आरोपी हे २८ ते १९ वर्षे वयोगटातील असून मागील अनेक दिवसांपासून त्यांच्यात काही केल्या सुधारणा होत नव्हती.त्यातच,टोळीमध्ये नवनवे सदस्य बनवून वेगवेगळ्या घटना घडवून आणणे आणि आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी गुन्हेगारी जगतात पकड निर्माण करण्याचा त्यांचा नित्यक्रम सुरू होता.आर्थिक फायद्यासाठी टोळीने असंख्य गुन्हे केले आहेत. आरोपींमध्ये २८ वर्षीय गँग लीडर चिराग गजभिये रा.गणेशपूर,भंडारा,सागर भुरे वय २६ वर्षे, आकाश बोरकर वय २० वर्षे,श्याम साठवणे वय २५ वर्षे,कुणाल भोंगाडे वय २५ वर्षे, मोहित शेंडे वय २१ वर्षे, रोशन सिंधी मेश्राम वय २४ वर्षे,रा.दहेगाव-धानला,ता.मौदा,नागपूर, भावेश आश्रम वय २८ वर्षे,गणेशपूर यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात आली आहे.तर फरार आरोपींमध्ये  साहिल रामटेके वय २२ वर्षे,आयुर थोटे वय २२ वर्षे,जवाहरनगर, भंडारा,यश भागडकर वय १९ वर्षे,पारडी,नागपूर,नील आंबिलधुके वय २५ वर्षे,दहेगाव,मौदा,मोनार्क शेंडे,कुकडे वय १९ वर्षे,वडोदा,मौदा यांचा समावेश आहे.
टोळीतील काही सदस्यांवर आधीच गंभीर गुन्हे दाखल आहेत.ज्यात खून,खुनाचा प्रयत्न,बेकायदेशीर शस्त्रांनी धमकावणे आणि खंडणी घेणे यांचा समावेश आहे. यापूर्वी,या आरोपींवर हद्दपारी आणि एमपीडीए कायद्यांतर्गत खटले चालवले गेले होते,परंतु त्यांच्या गुन्हेगारी कारवाया थांबण्याचे नावच घेत नव्हते. अश्यातच टोळीतील सर्व भंडारा-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन वाहने थांबवून वाहनचालकांना लाठ्या-काठ्या आणि हत्यारांनी धमकावत असत.वाहनांच्या खिडक्या फोडणे,मारहाण करणे आणि पळून जाण्यापूर्वी जबरदस्तीने पैसे हिसकावून घेणे,अशा कारवाया त्यांच्याकडून घडल्याच्या नोंदी आहेत.याप्रकरणी भंडारा पोलिसात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.टोळीची वाढती गुन्हेगारी लक्षात घेता  जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस अधीक्षक नुरुल हसन आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक नीलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि भंडारा पोलिस ठाण्याच्या पथकाने सदरची कारवाई केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बांधकाम कामगारांनो सावधान..! योजनांच्या नावाखाली कुणालाही पैसे देऊ नका- न्यू ह्यूमन राईट अँड फाईट रिसर्च फाउंडेशनचे आवाहन

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांच्या नावाखाली काही ठिकाणी एजंट,दलाल,मध्यस्थ किंवा इतर व्यक्तींमार्फत बांधकाम...

पुराचा तडाखा; तब्बल ७०० नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.यावेळी जिल्हाधिकारी...

रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा  दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील मालेगाव टाऊन परिसरात आज,गुरुवार ३० जुलै रोजी सकाळच्या...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे २५ मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नुकतेच दोन दिवसांपूर्वी नागपूरच्या  प्रादेशिक हवामान खात्याने गडचिरोली जिल्ह्यासाठी काल,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट,तर आज गुरुवारसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्यानुसार,जिल्ह्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!