- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-जिल्ह्यातील शालार्थ आयडी घोटाळ्यात नवनवीन आणि आश्चर्यकारक प्रकार उघडकीस येऊ लागले आहेत.विशेष म्हणजे,जी महिला कधी शाळेत ज्ञानार्जन व विद्यार्जन करायला गेलीच नाही; अश्या महिलेला शिक्षक दाखवून तिचे शालार्थ आयडीदेखील बनविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.प्रकरणी पोलिसांनी कान्होलाबारा येथील चित्रलेखादेवी भोसले उच्च प्राथमिक शाळा येथे कागदोपत्री सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत असलेल्या श्वेता नरेश नगराळे वय ४० वर्षे या आरोपी महिलेला अटक करून तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आश्चर्यचकित करणारी बाब म्हणजे,नगराळेने कधीही शाळेत जाऊन शिकविले नाही.मात्र मुख्याध्यापक, तत्कालीन शिक्षणाधिकारी,उपसंचालक व वेतन अधीक्षकासोबत संगनमत करून नगराळेचे शालार्थ आयडी तयार करण्यात आले.त्यानंतर,वेतन सुरू करण्यात आले.सप्टेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत नगराळेला वेतनापोटी ५ लाख ६५ हजार रुपये देण्यात आल्याचेही समोर आले आहे.ऑनलाइन शालार्थ आयडी प्रणालीचा गैरवापर करून अनेक शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती.या प्रकरणात विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी रवींद्र ज्ञानेश्वर पाटील यांच्या तक्रारीवरून सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.याचा तपास राज्यपातळीवरील विशेष तपास पथकाकडून (एसआयटी)सुरू आहे.तपासादरम्यान हा गैरप्रकार समोर आल्यावर नगराळेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आता शालार्थ आयडी घोटाळ्यातील अटकेतील आरोपींची एकूण संख्या २७ इतकी झाली आहे.यात ३ शिक्षण उपसंचालक,४ शिक्षणाधिकारी,१ वेतन अधीक्षक,४ मुख्याध्यापक,२ शाळा संचालक,४ सहाय्यक शिक्षक व ९ लिपिकांचा समावेश आहे.
- Advertisement -

