Friday, July 17, 2026
Homeभंडाराजिल्हा प्रशासनाला दणका; १२४ रेती घाटांवरील उत्खनन बंद ठेवण्याचे आदेश..

जिल्हा प्रशासनाला दणका; १२४ रेती घाटांवरील उत्खनन बंद ठेवण्याचे आदेश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :-जिल्ह्यातील रेती घाटांमधून रेती उत्खनन करण्यावर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण(एनजीटी)पुणे यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीत कडक निर्बंध लादले आहेत.जिल्ह्यातील सर्व १२४ रेती घाटांवरील उत्खनन बंद ठेवण्याचे आदेश एनजीटीने कायम ठेवले असून,यापूर्वी २४ घाटांना दिलेल्या मंजुरीवरून जिल्हाधिकारी कार्यालयाची चांगलीच कानउघाडणी केली.जिल्ह्यातील रेती उत्खनन आराखड्यावर पर्यावरण प्रेमींनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणकडे दाद मागितली होती.५ फेब्रुवारीला न्यायालयाने उत्खननावर तात्पुरती बंदी घातली होती.मात्र,सुनावणीपूर्वीच ९ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयाने २४ घाटांना उत्खननाची परवानगी दिली.न्यायालयाचा आदेश प्रलंबित असतांना ही परवानगी कशी दिली?असा सवाल करत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणने जिल्हा प्रशासनाला कडक शब्दात फटकारले आणि हा न्यायालयाचा अपमान असल्याचे नमूद केले.रेती उत्खनन बंद झाल्यामुळे सुमारे ९२ कोटी रुपयांचे नुकसान होणार असल्याचा दावा करत रेती घाट मालकांचे वकील न्यायालयात पोहोचले होते.मात्र, न्यायालयाने आर्थिक नुकसानापेक्षा पर्यावरणाला प्राधान्य देत त्यांचे म्हणणे ऐकण्यास नकार दिला. नुकसानाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.

  • सावन कुमार,भंडारा जिल्हाधिकारी👇
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणचा लेखी आदेश अद्याप प्राप्त झालेला नाही.आदेश मिळताच जिल्ह्यातील सर्व रेती घाटांवरील उत्खनन तत्काळ बंद करण्यात येईल. सर्वसामान्यांना स्वस्त दरात रेती मिळावी,या उद्देशाने १५ लाख ब्रास उत्खननाची परवानगी देण्यात आली होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलीस उपनिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.. – ३ लाख रुपये घेतांना रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात गुन्हा 'बी' फायनल करण्यासाठी मदत केली व पुढे भविष्यातही अशीच मदत करण्यासाठी ८ लाख रुपयांची मागणी करून...

आज २२ मिनी सेतू केंद्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण.. दुर्गम भागात लोकाभिमुख डिजिटल प्रशासनाला नवी दिशा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई/गडचिरोली :-गडचिरोलीत नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढली असून दुर्गम भागातील नागरिकांना केवळ प्रशासनाची उपस्थिती नव्हे,तर प्रशासनाचा लोकाभिमुख चेहरा...

वनहक्क पट्टेधारकांसाठी मोठा निर्णय; शेतकरी म्हणून मिळणार स्वतंत्र ओळख.. – विविध योजनांचाही मिळणार लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-वनहक्क पट्टेधारकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.वनहक्क कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासींना आता सुधारित सातबारा मिळणार असल्याने...

गडचिरोली जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा; शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.. – खताची जादा दराने विक्री केल्यास करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता व घाबरून न...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!