Tuesday, September 1, 2026
Homeकुरखेडाही कोणती पिक्चर..! जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत तरबेज अश्यांना कमी गुण;...

ही कोणती पिक्चर..! जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत तरबेज अश्यांना कमी गुण; तर रोजंदारी कर्मचाऱ्याला जास्त गुण.. – कुरखेडा तालुक्याच्या अरततोंडी गट ग्रामपंचायतीतील प्रकार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या अरततोंडी गट ग्रामपंचायत तर्फे घेण्यात आलेल्या शिपाई पदाच्या परीक्षेत मोठा गोचा गोंधळ झाल्याचा आरोप परीक्षार्थी उमेदवारांनी केला आहे.विशेष म्हणजे,जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत तरबेज असूनही त्यांना परीक्षेत कमी गुण मिळाले; तर ग्रामपंचायतीत रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला जास्त गुण मिळाल्याने पेपरफुटी झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.त्यामुळे, शिपाई पदाचा पेपर व परीक्षा पुनश्च घेण्याची मागणी ग्रामसेवक,सरपंच यांच्यामार्फत गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

शिपाई पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,गट ग्रामपंचायत अरततोंडी येथील शिपाई या पदाकरीता परीक्षा घेण्यात आली होती. पण,शिपाई पदाच्या पेपरची परीक्षा होण्याअगोदरच पेपरफुटी झाली.जे विद्यार्थी दोन ते पाच वर्षे एमपीएससी,सरळसेवा,पोलीस भरतीची तयारी करतात, अश्या उमेदवारांना कमी गुण मिळाले व त्याच ग्रामपंचायत मधील कर्मचारीला १०० पैकी ९१ गुण मिळाले.हे कसे शक्य आहे? त्यामुळे सदर परीक्षेत घोळ झाल्याचा आरोप करीत आपल्या कार्यक्षेत्रात नव्याने पेपर काढून परीक्षा घेत त्याच दिवशी निकाल जाहीर करावा,अशी मागणी ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडे सुमेध मेश्राम,विपीन मेश्राम,प्रणय ठवरे,मुकेश सुखदेवे,अमोल शेंडे,अनमोल सुखदेवे,विशाल फटिंग, रंजना तुलावी,मयूर डोंगरवार,भुमेश तुलावी,मिथुन ठलाल,शुभम नाकाडे,आशिष पंधरे आदींसह अन्यायग्रस्त उमेदवारांनी केली आहे.

विशेष बाब म्हणजे,बऱ्याच ठिकाणी जवळच्याच व्यक्तीची नियुक्ती केली जाते.काही वर्षापूर्वी कुरखेडा तालुक्यात एका गाव पातळीवरील भरतीत ज्याची निवड करायची होती,अश्या उमेदवाराला संपूर्ण पेपरच्या प्रश्नांची उत्तरे सांगण्यात आली होती.यात पहिल्या प्रश्नाचे उत्तर ब,दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर ड असे सांगण्यात आले होते आणि त्या उमेदवाराने पूर्व तयारीनिशी एका ठिकाणी वाच्यता केली होती.त्यामुळे त्याचा भांडाफोड झाला होता.मात्र,सिस्टममधील काहीजण चोरांचे साथीदार असल्याने प्रकरणावर पूर्णविराम झाले होते.त्यामुळे सदरचा प्रकार तसा तर नाही नां? यासाठी पेपर कोणी तयार केला? कुणाशी काही देवाणघेवाण तर झाली नाही नां? याचा तपास करणे आवश्यक आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!