Saturday, May 23, 2026
Homeमुंबईगावगाडा हाकण्यासाठी तयार रहा..! ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा अधिकृत कार्यक्रम घोषित..

गावगाडा हाकण्यासाठी तयार रहा..! ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा अधिकृत कार्यक्रम घोषित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक राज येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असतांनाच शासनाने सर्वांचा करेक्ट कार्यक्रम करून गावगाडा हाकणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा गुलाल उधळला आहे.जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती व नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग म्हणजेच वॉर्ड रचनेचा अधिकृत कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.ग्रामविकास विभागाच्या सहसचिव वर्षा भरोसे यांनी यासंदर्भात आज,मंगळवार १७ फेब्रुवारीला आदेश जारी केला आहे.
पहिल्या टप्प्यात तहसीलदार ‘गुगल अर्थ’च्या साहाय्याने २० फेब्रुवारीपर्यंत गावांचे नकाशे अंतिम करतील. त्यानंतर,दुसऱ्या टप्प्यात २७ फेब्रुवारीपर्यंत संबंधित तलाठी आणि ग्रामसेवक प्रभागांच्या सीमा निश्चित करतील.तिसऱ्या टप्प्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर २३ मार्च २०२६ पर्यंत राज्य निवडणूक आयोग या प्रस्तावांना अंतिम मान्यता देईल.७ एप्रिल २०२६ रोजी प्रभाग रचनेचा मसुदा(प्रारूप) जाहीर केला जाईल.नागरिकांना ७ ते १३ एप्रिल २०२६ या कालावधीत आपल्या हरकती किंवा सूचना नोंदवता येतील.प्राप्त झालेल्या हरकतींवर २१ एप्रिलपर्यंत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सुनावणी पार पडेल.
सर्व हरकतींचा निपटारा केल्यानंतर आणि प्रस्तावांची पडताळणी पूर्ण झाल्यावर,जिल्हाधिकारी २८ एप्रिलपर्यंत अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करतील.त्यानंतर,४ मे २०२६ रोजी अधिकृतरीत्या अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे.यानंतर ग्रामपंचायत निवडणूकीचा धुराळा उडणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल ४३४ रिक्त पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन.. – पदांनुसार मासिक वेतन मिळणार १६ हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता...

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांना मिळणार राष्ट्रीय स्तरावरील गौरव.. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत सन-२०२७ साठी दिल्या जाणाऱ्या ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’साठी अर्ज मागविण्यात आले आहेत.शिक्षण,कला,सांस्कृतिक कार्य,क्रीडा, नाविन्यपूर्ण शोध,सामाजिक...

अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज,शुक्रवार २२ एप्रिल रोजी भीषण अपघाताची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली.विरूध्द दिशेने भरधाव वेगात असलेल्या एका अज्ञात...

प्रलंबित बिल आणि नवीन काम देण्यासाठी दोन टक्के दराने मागितले ७० हजार.. -जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कामाचे प्रलंबित असलेले बिल काढून देण्यासाठी व नवीन काही कामे तुम्हालाच देणार म्हणून दोन टक्के प्रमाणे ७० हजाराची लाचेची मागणी करणाऱ्या जलसंपदा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!