Friday, June 19, 2026
Homeदेसाईगंजकृषी पंपांना २४ तास वीज पुरवठ्यासाठी शेतकरी आक्रमक - कनिष्ठ अभियंता उपकेंद्र शंकरपूर...

कृषी पंपांना २४ तास वीज पुरवठ्यासाठी शेतकरी आक्रमक – कनिष्ठ अभियंता उपकेंद्र शंकरपूर कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा व जेल भरो आंदोलन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज :- तालुक्यातील शंकरपूर व परिसरातील शेतकरी बांधवांनी कृषी पंपांना २४ तास वीज पुरवठ्यासाठी आज १६ मार्च २०२३ रोजी कनिष्ठ अभियंता उपकेंद्र शंकरपूर कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा व जेल भरो आंदोलन करण्यात आला. शेतकरी बांधवांनी आक्रमक पावित्रा घेत देसाईगंज येथील महावितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता यांच्या मार्फत उर्जा विभागाचेव्यवस्थापकीय संचालक यांना दिलेल्या निवेदनातुन २४ तास वीज पुरवठा करण्याची मागणी फेटाळण्यात आल्यामुळे देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांनी छगन शेडमाके यांच्या नेतृत्वात विज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून जेल भरो आंदोलन केले.

 आंदोलना दरम्यान येथील शेतकऱ्यांनी एकुणच शासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण करत २४ तास वीज पुरवठ्यासाठी आग्रही असलेल्या आमदारांनी सत्तेत येताच शेतकऱ्यांची दिशाभूल करून शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास भाग पाडले असल्याने येत्या निवडणुकांत तालुक्याच्या कोणत्याही गावात प्रचार करू न देण्याचा एकमताने निर्णय घेत ‘जो किसान की बात करेगा,वही देश पे राज करेगा’ च्या जोरदार घोषणा देत परिसरातील हजारो संख्येच्या सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत शंकरपुर स्थित महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून जेल भरो आंदोलन केले.

दरम्यान आंदोलन हिंसक वळण घेणार नाही याची दक्षता घेत देसाईगंज पोलिसांनी शेकडो आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले होते. यात प्रामुख्याने जेष्ठ नेते परसराम टिकले,सामाजिक कार्यकर्ते छगन शेडमाके,नंदु नरोटे,पिंकु बावणे,नितीन राऊत,वामन सावसाकडे, गजानन सेलोटे,विलास बन्सोड,विलास ढोरे,होमराज हारगुळे,नरेशलिंगायत, विनायक वाघाडे,जगदीश शेंद्रे,मनोज ढोरे,अभय नाकाडे,महेश भरणे,अभय बुद्धे,आशिष गभने,युवराज गभणे,चक्रधर नाकाडे,बालु दुनेदार,यादव बन्सोड,संदिप वाघाडे,उमाशंकर हारगुळे,गणेश वारगुळे आदी शेतकऱ्यांना देसाईगंज पोलिसांनी स्थानबद्ध करून अटी व शर्थिच्या अधिन राहुन सोडले.तथापी शेतकऱ्यांची मागणी पुर्ण करण्याकडे दुल॔क्ष करून तोंडाला पाने पुसल्या गेले असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी अधिक आक्रमक पवित्रा घेत येत्या तीन दिवसाच्या आत मागणी मान्य करून किमान १६ तास वीज पुरवठा करण्यात न आल्यास देसाईगंज येथील महावितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालया समोर चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आंदोलक शेतकऱ्यांनी दिली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!