Sunday, August 23, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त"३५० रुपयाच्या खताच्या बॅगचे ४९० रुपये घेतलेच कसे?" असे म्हणत जिल्हा ग्राहक...

“३५० रुपयाच्या खताच्या बॅगचे ४९० रुपये घेतलेच कसे?” असे म्हणत जिल्हा ग्राहक मंचात घेतली धाव.. – कृषी केंद्र चालकाला घडवली अद्दल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-एखादा दुकान,हॉटेल वा एखाद्या आस्थापनामधील वस्तू प्रिंट रेटनुसार न विकता जादा दराने विकली जाते,तरीही काहीजण मुकाट्याने खरेदी करून आपल्या अधिकारावर गदा आणतांना दिसून येतात.मात्र,सदरच्या प्रकरणात एका शेतकऱ्याने “३५० रुपयाच्या खताच्या बॅगचे ४९० रुपये घेतलेच कसे?” असे म्हणत जिल्हा ग्राहक मंचात धाव घेत कृषी केंद्र चालकाला अद्दल घडवली आहे.प्रकरणी यवतमाळ जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष डॉ.रवींद्र उल्हास मराठे यांनी शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय देत प्रिंट रेटनुसार जादा घेतलेले १४० रुपये ११ ऑक्टोंबर २०२२ पासून १० टक्के व्याजासह तसेच शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल १० हजार आणि तक्रार खर्चाचे ५ हजार रुपये द्यावे,असा आदेश कृषी केंद्राला दिला आहे.
  • प्रकरण काय?👇
यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी(तालुका)येथील शेतकरी दिगांबर विठ्ठलराव होडगीर यांनी शहरातील निलावार कृषी केंद्रातून आरसी फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड लखमापूर(नाशिक)निर्मित गोदावरी नामक सुपर फॉस्फेटची एक खताची बॅग ४९० रुपयांना खरेदी केली होती.कृषी केंद्राने त्यांना तेवढ्या रकमेची पावतीही दिली.बॅग रिकामी झाल्यावर होडगीर यांना खताच्या बॅगवर एमआरपी ३५० रुपये असल्याचे लक्षात आले.३५० रुपयाची खताची बॅग ४९० रुपयाला विकली, म्हणजेच १४० रुपये जास्तीचे घेण्यात आले.त्यामुळे, जास्तीचे घेतलेले १४० रुपये परत मिळावे,यासाठी शेतकऱ्याने निलावार कृषी केंद्राशी संपर्क करून जास्त घेतलेली रक्कम परत करा; असे म्हटले.परंतु कृषी केंद्र चालकाने रक्कम परत करण्यास नकार दिला.कृषी केंद्राकडून रक्कम परत मिळण्याची कुठलीही चिन्हे दिसत नसल्याने शेतकरी दिगांबर होडगीर यांनी १२ जानेवारी २०२३ रोजी यवतमाळ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात धाव घेतली.मंचाचे अध्यक्ष डॉ.रवींद्र उल्हास मराठे, सदस्य अमृता वैद्य यांच्या उपस्थितीत या तक्रारीवर मंगळवार २० जानेवारी २०२६ रोजी सुनावणी झाली.यामध्ये कृषी केंद्राने होडगीर यांच्याकडून खताच्या बॅगवर १४० रुपये जास्तीचे घेतले.शिवाय,ते परत देण्यासही नकारात्मक भूमिका घेतल्याचे सिद्ध झाल्याने शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय देण्यात आला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे दोन मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात दोन दिवसांपासून अधून-मधून पावसाची संततधार सुरू आहे.पावसामुळे काही ठिकाणची नाले पाण्याने भरभरून वाहू लागले आहेत. अश्यातच काही नाल्यांवरील पुल ठेंगणे...

शेतावर गेला ‘तो’ घरी परतलाच नाही; आज सापडला मृतदेह.. – कोंढाळा येथील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-शेतावर धानपिकाला खत मारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा दुसऱ्या दिवशी चक्क मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना ही देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा...

देसाईगंज ठाणेदारांची सट्टा-पट्टी व्यवसायावर धाड; ११ जण गजाआड.. – दुचाकी वाहनांसह साहित्य नेले उचलून..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहरातील मुख्य बाजारपेठेसह तालुक्यातील विविध गावात सट्टा-पट्टी व्यवसायाला मोठे उधाण आल्याची बाब उघडकीस येताच नव्याने रुजु झालेले देसाईगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार...

आमदार रामदास मसराम यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त आज शनिवारी कुरखेडा तालुक्याच्या आंधळी गावातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!