- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्हा स्थळापासून अवघ्या १५ किलोमिटर अंतरावर असलेल्या शहापूर गावात आज,शनिवार २४ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.अज्ञात हल्लेखोरांनी एका ग्रामपंचायत सदस्याच्या कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.विशेष म्हणजे,हल्लेखोरांनी घरावर पेट्रोल बॉम्बने हल्ला केला, मात्र कुटुंबिय पटकन जागे झाल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी हल्लेखोरांनी पेटवलेल्या आगीत गाडेकर यांच्या घराच्या आवारात उभ्या असलेल्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.यात चार दुचाकी वाहने व एका कारचा समावेश आहे.घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,भंडारा तालुक्याच्या शहापूर ग्रामपंचायतीचे सदस्य सचिन गाडेकर व कुटूंबीय गाढ झोपेत असतांना आज पहाटेच्या सुमारास काही अज्ञात हल्लेखोरांनी गाडेकर यांच्या घरावर पेट्रोल बॉम्बने हल्ला केला.घराच्या आवारात अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.बॉम्ब फुटताच आगीने रौद्र रूप धारण केले. घराच्या अंगणात उभ्या असलेल्या चार दुचाकी आणि घरासमोरील एक कार यांना आग लागली.काही मिनिटांतच या सर्व वाहनांनी पेट घेतला. घरालाही आग लागण्याची शक्यता निर्माण झाली होती, मात्र सदरचा प्रकार पटकन लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला.घटना घडताच गाडेकर कुटुंबीयांनी जोरजोराने
आरडाओरड सुरू केली.त्यांच्या आवाजामुळे शेजारील नागरिकांनी धाव घेत घेतली.स्थानिक नागरिकांनी पाणी आणि इतर साधनांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.तोपर्यंत वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.या घटनेमागे वैयक्तिक वाद,जुन्या भांडणातून सूड की राजकीय कारण,याबाबत अद्याप कोणतेही कारण स्पष्ट झाले नाही.घटनेची माहिती जवाहरनगर पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आली असून ग्रामपंचायत सदस्याच्या घरावर थेट पेट्रोल बॉम्बने हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
- Advertisement -

