Saturday, October 17, 2026
Homeनागपूरकुटुंबीयांना 'तिच्या' वागणुकीवर संशय आला अन् भांडाफोड झाला.. - अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार..

कुटुंबीयांना ‘तिच्या’ वागणुकीवर संशय आला अन् भांडाफोड झाला.. – अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :-एका २१ वर्षीय जीम ट्रेनरने १५ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस बेड्या ठोकल्याची घटना नागपूरच्या राणाप्रतापनगर येथे उघडकीस आली.भुवन ऊर्फ अभी वय २१ वर्षे असे आरोपी जीम ट्रेनर तरुणाचे  नाव आहे. अल्पवयीन मुली सहजपणे प्रेमाच्या जाळ्यात अडकत असल्याने याचा अनेकजण फायदा घेतांना दिसून येतात.अश्याच प्रकारे आरोपी भुवनची १५ वर्षीय विद्यार्थिनीशी ओळख झाली.ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले.यामुळे मुलीच्या वागणुकीत बदल झाला. मुलीच्या वर्तणुकीत बदल झाल्याने कुटुंबीयांना शंका आली. त्यामुळे तिला विचारणा केली असता संपूर्ण प्रकार समोर आला.तिच्या घरी कुणीही नसतांना त्याने तिच्यावर अत्याचार केला व त्यानंतर सातत्याने हा प्रकार सुरू होता.जर कुणाला काहीही सांगितले तर त्याने पालकांना मारण्याची धमकी दिली होती.लागलीच कुटुंबीयांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.प्रकरणी राणाप्रतापनगर पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.विशेष म्हणजे, ‘पॉक्सो’ कायद्यामुळे कमी वय असलेल्यांची चलती आहे.तुम्ही प्रेम करा नाहीतर स्वतःला कितीही निर्दोष ठरविण्याचे प्रयत्न करा,या कायद्याच्या कचाट्यात जो सापडला तो संपला म्हणून समजा.त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच किशोरवयीन मुला-मुलींच्या खऱ्या प्रेमासाठी ‘प्रेमळ’ भूमिका मांडत,अशा जोडप्यांवर पॉक्सोतील कडक कलमांमुळे गुन्हेगारीचा शिक्का बसू नये म्हणून कायद्यात सुधारणेची सूचना केंद्र सरकारला केली आहे.बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यात (पोक्सो)’रोमिओ-ज्युलियट कलम’ समाविष्ट करण्याचा मुद्दा केंद्र सरकारपुढे ठळकपणे मांडला आहे.काही प्रकरणांत हा कायदा पालकांचा विरोध, सामाजिक दबाव,प्रतिष्ठेचा प्रश्न किंवा सूडबुद्धी यासाठी वापरला जात आहे.परिणामी,खऱ्या पीडितांसाठी असलेला कायदा परस्पर संमतीतील किशोरवयीन नात्यांवर कठोरपणे लागू होतो आणि न्यायाची दिशा भरकटते,असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विविध शिष्यवृत्तीसाठी एनएसपी व महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नोंदणीचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील अर्ज केंद्र शासनाच्या राष्ट्रीय...

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!