Tuesday, September 1, 2026
Homeदेसाईगंजडॉक्युमेंट्री स्पर्धेत मंगेश जनबंधू नागपूर विभागातून द्वितीय..

डॉक्युमेंट्री स्पर्धेत मंगेश जनबंधू नागपूर विभागातून द्वितीय..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
प्रियंका ठाकरे
देसाईगंज(गडचिरोली):-राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यावतीने राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध सर्जनशील स्पर्धांमध्ये भिवापूर एज्युकेशन सोसायटी गर्ल्स हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक मंगेश जनबंधू यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
नागपूर विभागातील स्पर्धकांमधून त्यांच्या ‘शिक्षण बदलतंय..?’ या माहितीपटाला(डॉक्युमेंट्री)द्वितीय क्रमांक प्राप्त झाला असून सदर माहितीपटातून शैक्षणिक क्षेत्रातील बदलांचे वास्तवदर्शी चित्रण करीत अनेक विचारप्रवर्तक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.सर्व विभागांतील विजेत्यांचे माहितीपट राज्यस्तरीय पुनर्परीक्षणासाठी पाठविण्यात येणार असून त्यातून अंतिम राज्यस्तरीय विजेते घोषित केले जाणार आहेत. मंगेश जनबंधू यांचे हे यश त्यांच्या सर्जनशीलतेचे आणि शिक्षणाविषयीच्या तळमळीचे उत्तम उदाहरण ठरत आहे.याआधीही त्यांनी कव्हर साँग,अल्बम साँग,तसेच विविध माहितीपटांचे दिग्दर्शन व संपादन यासारखी उल्लेखनीय कामे केली आहेत. सध्या ते भिवापुरी मिरची या नवीन डॉक्युमेंट्रीच्या एडिटिंगवर कार्य करीत आहेत. मंगेश जनबंधू हे साहित्यिक तथा गझलकार म्हणूनही सुपरिचित आहेत.त्यांच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक हुलके तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी अभिनंदनाचा वर्षाव करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!