Wednesday, July 29, 2026
Homeकोंढाळासामाजिक बांधिलकी जपणारे कोंढाळा येथील युवा सिव्हील इंजिनियर नीलेश दुपारे..

सामाजिक बांधिलकी जपणारे कोंढाळा येथील युवा सिव्हील इंजिनियर नीलेश दुपारे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(गडचिरोली):-शेकडोहून अधिक युवकांचे मार्गदर्शक,सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे,सामाजिक कार्यात हिरीहिरीने सहभाग दर्शवून गोर-गरीबांच्या मदतीला तत्काळ धावून जाणारे देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथील  रहिवासी युवा सिव्हील इंजिनियर नीलेश दुपारे यांच्या कार्यप्रतिष्ठेबाबत बोलावे तितके कमीच आहे.नुकतेच देसाईगंज पोलीस ठाण्याच्या वतीने राबविण्यात आलेल्या “महाराष्ट्र पोलीस दल स्थापना” दिनाचे औचित्य साधून देसाईगंज शहराच्या क्रीडा संकुल या ठिकाणी झालेल्या भव्य रक्तदान शिबीरात रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
समाजाकडून जेवढे घेणे असते,तितकेच आणि त्याहून अधिक आपले सामाजिक योगदान समाजाला देणे असावे; अशी विचारधारा मनी बाळगून नीलेश दुपारे यांनी केवळ बांधकामे वा व्यवसायाशी निगडित असलेल्या कामांना प्राधान्य न देता समाजकार्यात स्वतःला झोकून दिले आहे.आजच नाही तर पूर्वीपासूनच काहीजण नुसता दिखावा करून समाजकार्याचे राजकारण करू लागलेत.काही दिवस ‘मी किती लोकांची कामे करतोय’,असे दाखवून राजकारणात येतात आणि आपली पोळी शेकून घेतात.अश्यांना केवळ पैसा प्यारा असतो,जनतेशी कसलेही देणेघेणे नसते.मात्र,या सर्वांना अपवाद ते म्हणजे युवा सिव्हील इंजिनियर नीलेश दुपारे.यांच्या बाबतीत सांगायचे झाले तर,कोंढाळा गावातील तो प्रसंग नेहमी स्मरणात राहील.दोन वर्षापूर्वी गावातील विद्यानिकेतन लोकमान्य टिळक संकुल विद्यालयातील एका शालेय विद्यार्थ्याचा शाळेच्या सुट्टीच्या दिवशी क्रीडा खेळाचे सराव करतांना हात मोडला होता.विद्यार्थ्याच्या घरची परिस्थिती हालाखीची असल्याने रुग्णालयात येणारा लाखो रुपयांचा खर्च कुठून करणार,या विवंचनेत कुटूंबीय सापडलेले असतांनाच नीलेश दुपारे यांनी युवकांसोबत मिळून सर्वप्रथम त्या विद्यार्थ्याला ब्रम्हपुरीच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.रुग्णालयात प्रथमोपचारासाठी लागणारी काही रक्कम स्वतःच्या खिशातील जमा केली व नंतर गावातून वर्गणी गोळा करून विद्यार्थ्याचे औषधोपचार करून घेतले.अशी अनेक कार्य करून सामाजिक बांधिलकी जपणारे कोंढाळा येथील युवा सिव्हील इंजिनियर नीलेश दुपारे यांच्या कार्याला आजही अनेकजण सलाम ठोकतात.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तुकाराम मुंढेंनी शाळा व्यवस्थापनावर सोपवली मोठी जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विविध निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असतांनाच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

राज्यांतर्गत पिकस्पर्धा; आता शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने...

राज्य सरकार म्हणतेय; गौण खनिजांच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर दहापट दंड आकारू.. -चोर खरोखरच चोऱ्या करणे सोडणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-गौण खनिजांची चोरी करणे ही काही चोरट्यांसाठी नित्याचीच बाब झाली आहे.काहींना अवैध रेती,मुरूम,दगड,माती व इतर गौण खनिजांची चोरी केल्याशिवाय चैनच पडेनासे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!