- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-एका विवाहित तरुणाने धावत्या मालवाहू रेल्वेगाडी समोर येत आत्महत्या केल्याची घटना आज, गुरुवार ८ जानेवारी रोजी सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास अर्जुनी-मोरगाव रेल्वे स्थानक परिसरात घडली.संदिप वसंत नाकाडे वय ४२ वर्षे,रा.ताडगांव, ता.अर्जुनी-मोरगाव,जि.गोंदिया असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो अर्जुनी-मोरगाव शहरात कृषी केंद्र चालवीत होता.
आज गुरुवारी सकाळच्या सुमारास गोंदियाहून चंद्रपुरकडे एक मालवाहू रेल्वेगाडी धावत होती.सदरची गाडी अर्जुनी-मोरगाव रेल्वे स्थानक परिसरात येताच संदिप नाकाडे हा तिच्या समोर आला आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले.दृश्य बघताच घटनास्थळी नागरिकांचा मोठा जमाव झाला.लागलीच रेल्वे पोलीस व स्थानिक पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.संदिपने घेतलेला निर्णय कुटुंबियांवर मोठा आघात करून गेला आहे.तरुण व्यवसायिकाने आत्महत्या कां केली,अद्याप गूढ कायम आहे.
- Advertisement -

