Thursday, September 10, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा.. आता वेळीच व योग्य दरात युरिया खत...

गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा.. आता वेळीच व योग्य दरात युरिया खत होणार उपलब्ध..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-खरीप हंगाम २०२५ च्या खतांची टंचाईचा अभ्यास करून यापुढे खताची टंचाई भासू नये यासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या कृषि विभागाने व जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.तेलंगणा राज्यातील रामागुंडम येथील नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड(NFL)कारखान्यातून गडचिरोली जिल्ह्यासाठी युरियाचा पुरवठा आता थेट रस्ते मार्गाने (By Road) सुरू करण्यात आला आहे.यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळीच व योग्य दरात खत उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे.
साधारणपणे खतांचा पुरवठा रेल्वे रॅकद्वारे कंपनीच्या घाऊक विक्रेते/डीलर्स यांना केला जातो आणि तिथून पुढे जिल्ह्यातील किरकोळ विक्रेत्यांना वितरण होते.मात्र, अनेकदा रेल्वे रॅक उपलब्ध होण्यास विलंब होत असल्याने ऐन हंगामात खतांची टंचाई निर्माण होते. तसेच गडचिरोली जिल्ह्यात एकमेव देसाईगंज(वडसा)हे रेल्वे केंद्र आहे,सद्यास्थित गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज (वडसा)व चंद्रपूर या दोन रेक ठिकाणावरून खत पुरवठा होत असतो,परंतु सिरोंचा,अहेरी,भामरागड व एटापल्ली सारख्या भागात रेक ठिकाणापासून अंतर जास्त असल्याने खत वाहतूक व वाहतूक भाड्याच्या समस्या होत्या,ही अडचण लक्षात घेता कृषी विभागाने मागील वर्षांपासून रामागुंडम (तेलंगणा)येथील नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (NFL)कारखान्यातून गडचिरोली जिल्ह्यासाठी युरियाचा पुरवठा थेट रस्ते मार्गाने(By Road)सुरू करण्यात यावा याबाबत केलेल्या पाठपुराव्यामुळे रामागुंडम येथून ट्रकद्वारे थेट पुरवठा करण्याच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे व यातील पहिला टप्पा १०० मेट्रिक टन युरिया खत अहेरी येथे या आठवड्यात येणार आहे.
विशेष म्हणजे,रामागुंडम(तेलंगणा)येथील नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड(NFL)कारखान्याचे १२ लाख मे.टन एवढे वार्षिक युरिया उत्पादन आहे.आतापर्यंत वाहतूक अडचणी आणि पुरवठ्यातील विलंबामुळे गडचिरोली जिल्ह्यात जुलै,ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यात युरियाचा तुटवडा जाणवत होता.मात्र,आता
रामागुंडम ते सिरोंचा,अहेरी,गडचिरोली हे अंतर कमी असल्याने ट्रकमार्फत युरिया वेळेत पोहोचणे शक्य झाले आहे.यामुळे शेतकऱ्यांना दिलासा,धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात एकाच वेळी धानाची रोवणी होत असल्याने माहे जुलै व ऑगस्ट महिन्यात खताची मोठी मागणी वाढून जाते.या पुरवठ्यामुळे दुकानांमध्ये युरिया सहज उपलब्ध होईल. काळाबाजार रोखण्यास मदत,खतांचा पुरेसा साठा उपलब्ध झाल्यामुळे चढ्या दराने विक्री किंवा काळाबाजाराला लगाम बसेल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सदर प्रस्ताव मंजूर करण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे,जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रिती हिरळकर,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार,कृषि विकास अधिकारी किरण खोमणे,मोहीम अधिकारी आनंद पाल, एनएफएल कंपनीचे महाराष्ट्र राज्य प्रबंधक सुरेश कुमार उज्जैनिया,शेखर मुंढे सहाय्यक क्षेत्रीय प्रबंधक नागपूर यांचे विशेष सहकार्य लाभले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप..!

उद्रेक न्युज वृत्त :-युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने उद्या,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी एक दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली...

राज्यस्तरीय ज्युनियर ‘कुंग फू’ स्पर्धेत वांगेपल्ली शाळेच्या मोहनला कांस्यपदक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पुणे येथे पार पडलेल्या २४ व्या राज्यस्तरीय 'ज्युनियर वुशू स्पर्धा-२०२६' मध्ये अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथील शासकीय निवासी शाळेचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी...

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!