Monday, August 31, 2026
Homeनागपूरशेतकऱ्यांच्या प्रश्नावर निर्णय घेण्यात दिरंगाई; चंद्रपूर जिल्हाधिकारी कायद्याच्या कचाट्यात..!

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निर्णय घेण्यात दिरंगाई; चंद्रपूर जिल्हाधिकारी कायद्याच्या कचाट्यात..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-कोणी कितीही मोठा अधिकारी असो, कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही.त्यातच,शासकीय अधिकारी असो वा कर्मचारी हे शासनाचे नोकर तर जनतेचे लोकसेवक आहेत.मात्र,काहीजण स्वतःला मोठे अधिकारी समजून खुर्चीच्या बाहेर पडण्यास तयार नाहीत.महत्वाचे म्हणजे,तुम्ही जनतेची कामे करण्यासाठी आहात,हे विसरून चालणार नाही.अश्यातच ज्या शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर न्याय मिळायला पाहिजे,अश्या शेतकऱ्यांना न्यायासाठी न्यायालय गाठावे लागले.ही शोकांतिका आहे.विशेष म्हणजे,कंपनीकडून शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होत असतांनाही जिल्हाधिकारी स्वतः निर्णय देत नसतील तर अश्यांना काय म्हणावे?
प्रकरण असे की,चंद्रपूर तहसील कार्यालयातंर्गत येणाऱ्या अंतुर्ला येथील शेतकरी अशोक कौरासे व इतर पाच शेतकऱ्यांच्या शेतीच्या शिवधुऱ्यावरून जल संसाधन विभागाने ताडाळी एमआयडीसी येथील धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला ६०० मेगावॉट क्षमतेच्या पॉवर स्टेशनसाठी वर्धा नदीमधील पाणी वापरण्यास,तर जिल्हाधिकाऱ्यांनी पॉवर स्टेशनपर्यंत पाणी वाहून नेण्यासाठी पाइपलाइन टाकण्यास परवानगी दिली होती. परंतु,कंपनीने शिवधुऱ्यासह शेतातूनही सुमारे २० किलोमीटर लांब पाइपलाइन टाकली.पाइपलाइन अनेकदा फुटते.यामुळे शेतपिकांचे व जमिनीच्या दर्जाचे नुकसान होते.त्यामुळे शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. याचिकेत शेतामधील पिके नष्ट होणे,जमिनीचा दर्जा खालावणे आदीकरिता ४ हजार ४४४ रुपये प्रतिचौरस मीटरनुसार नुकसानभरपाई देण्यात यावी,अशी मागणी आहे.उच्च न्यायालयाने जुलैमध्ये शेतकऱ्यांची जनहित याचिका निकाली काढतांना दोन महिन्यांत निर्णय घ्या,असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता.मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले.प्रकरणी शेतकऱ्यांच्या वकील ॲड.शिल्पा गिरटकर यांनी न्यायालयाला सांगितले. शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना २९ ऑक्टोंबर व २५ नोव्हेंबर रोजी निवेदन सादर करून मागणीवर निर्णय घेण्याची विनंती केली होती.परंतु,त्याकडेदेखील गांभीर्याने पाहण्यात आले नाही,याकडे ॲड.गिरटकर यांनी लक्ष वेधले.त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.यांना अवमान नोटीस बजावून येत्या,४ मार्चपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.सदर प्रकरणावरून खुद्द जिल्हाधिकारी शेतकऱ्यांच्या बाबतीत किती दक्ष असतात,हे निदर्शनास येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!