Tuesday, September 1, 2026
Homeगोंदियालावारे शाळेचे दरवाजे,ठोका कुलूप; गावकरी संतापले; दोन गुरुजींची झाली नियुक्ती..

लावारे शाळेचे दरवाजे,ठोका कुलूप; गावकरी संतापले; दोन गुरुजींची झाली नियुक्ती..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-शिकून मोठे व्हायचे असेल तर, शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही.मात्र,शाळेत विद्यार्थी आहेत,पण शिकवण्यासाठी शिक्षकच नसतील तर शाळेत जाण्याचा प्रश्नच उरत नाही.त्यातच,शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या शाळेत केवळ एकच शिक्षक असेल तर तेथील अवस्था कशी असणार? अश्याच प्रकारे गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील संवेदनशील राजोली-भरनोली गावातील प्राथमिक शाळेत पहिली ते सातवीपर्यंत एकूण १२४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.पण,त्यांना शिकवायला फक्त एकच शिक्षक आहे.एका वर्गात वर्णमाला,तर दुसऱ्या वर्गात गणिताचे पाढे आणि मधल्या वर्गात इतिहासाच्या गोष्टी या सगळ्यांचा ताळमेळ एकट्या गुरुजींच्या भरवशावर चालत होता.सदरचा प्रकार गेल्या वर्षभरापासून येथे सुरू होता.शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची मागणी वांरवार पालक व शाळा व्यवस्थापन समितीने करूनसुद्धा शिक्षण विभागाने दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आता “गाव करी ते राव न करी” या म्हणी प्रमाणे लावारे शाळेचे दरवाजे, ठोका कुलूप,असे म्हणत काल सोमवारी शाळेला कुलूप ठोकले अन् शाळेजवळच ठिय्या मांडला.याची माहिती जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांधे आणि पंचायत समिती सदस्यांना कळताच त्यांनी राजोली येथे पोहोचत पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे म्हणणे ऐकून घेतले.त्यांनी त्वरित अर्जुनी मोरगावचे गटशिक्षणाधिकारी, गट विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधला.यानंतर त्यांनी चर्चा करण्यासाठी दोन शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना राजोली येथे पाठविले व त्वरित एका शिक्षकाची नियुक्ती केली,तर गुरुवार २५ डिसेंबरला दुसरा शिक्षकसुद्धा शाळेत रुजू होईल,असे लेखी पत्र दिल्याने गावकऱ्यांनी शाळेच्या प्रवेशद्वाराला ठोकलेले कुलूप उघडून आंदोलनाची सांगता केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!