- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना त्या-त्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेतील समाजकल्याण विभागाकडून ५० हजार रुपये मिळतात, हे बरेच जणांना माहीत आहे.पण,एका योजनेतून नुकतेच आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना २ लाख ५० हजार रुपये मिळतात,याची अनेकांना माहितीच नाही. कोणत्याही जातीतील युवक वा युवतीने दलित समुदायातील व्यक्तीसोबत विवाह केले,तर त्या जोडप्याला अडीच लाखांची आर्थिक मदत दिली जाते. सदरची योजना ही ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्कीम फॉर सोशल इंटिग्रेशन थ्रू इंटर कास्ट मॅरेजेस’ नावाने २०१३ पासून आजही सुरू आहे आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनद्वारे सर्वत्र राबवली जात आहे.या योजनेंतर्गत दिली जाणारी मदत ही फक्त पहिल्या विवाहासाठी दिली जाते.विवाहानंतर एका वर्षाच्या आत अर्ज करणे बंधनकारक आहे.तसेच विवाह करणाऱ्या दोघांपैकी एक व्यक्ती दलित समुदायातील असणे आवश्यक आहे.त्यातच,विवाह हिंदू मॅरेज ॲक्ट,१९५५ अंतर्गत नोंदणीकृत असावे.विशेष म्हणजे,आंतरजातीय विवाह केल्यानंतर शासनाकडून वा इतर योजनेतून लाभ घेतला असेल तर तेवढी रक्कम अडीच लाखातून कपात करून उर्वरित रक्कम जोडप्यांना दिली जाते.अडीच लाख रुपये हे दोन टप्प्यात वितरीत करण्यात येतात. पहिल्या टप्प्यात दीड लाख रुपये थेट जोडप्याच्या जॉइंट बँक खात्यात जमा केले जातात.तर उर्वरित एक लाख रुपये हे तीन वर्षांसाठी ‘एफ डी’ म्हणजेच मुदत ठेव म्हणून ठेवली जाते व तीन वर्षांनंतर,व्याजासह ती रक्कम जोडप्याला दिली जाते.यासाठी विवाह प्रमाणपत्र, जोडीदाराचे जात प्रमाणपत्र,पहिल्या लग्नाचे प्रमाणपत्र/स्वतःचे प्रतिज्ञापत्र,उत्पन्न प्रमाणपत्र,जॉइंट बँक अकाऊंट इत्यादी कागदपत्रे आवश्यक असून आंतरजातीय विवाह करणारे जोडपे तीन प्रकारे अर्ज करू शकतात.आपल्या खासदार किंवा आमदाराच्या शिफारशीसह अर्ज पाठवू शकता.जिल्हा प्रशासन किंवा राज्य सरकारमार्फत अर्ज सादर करू शकता किंवा थेट डॉ.बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकता.
माहितीसाठी वेबसाईट👇
- Advertisement -

